Crime In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : खळबळजनक! गोव्यात आई- वडीलांकडून 8 महिन्यांच्या बाळाला रेल्वे स्टेशनवर विकण्याचा प्रयत्न

आईसह अन्य तिघांवर गुन्हा नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : आठ महिन्यांच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केल्याची घटना राज्यात उघडकीस आली आहे. ही घटना मडगाव रेल्वे स्थानकावर उघडकीस आली. याप्रकरणी पोलीसांनी बाळाच्या वडिलाला अटक केली आहे. तर आईसह अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे निरिक्षक सचिन पन्हाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बेल्लारी येथील हे दांपत्य काल आपल्या बाळाला घेऊन मडगाव रेल्वे स्थानकावर आले होते. वास्को येथील एका कंत्रादारांने हे बाळ विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. यात एका मध्यस्थाचाही हात असल्याची माहिती त्यांनी दिली.

बाळाच्या आईला वारंवार मिरगीचे झटके येत असत. त्यामुळे लहान बाळाला सांभाळणे अशक्य झाले. त्यामुळे बेल्लारी येथील या दांपत्याने आपल्या आठ महिन्याच्या बाळाला विकण्याचा प्रयत्न केला.

बाळ विकण्याच्या रकमेवरून दांपत्य व मध्यस्थ यांच्यामध्ये वाद झाला. त्याच वेळी तिथून जात असलेल्या एका पोलिसाच्या कानी हा वाद पडला. लहान बाळाला विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याने त्या चारही जणावर मानवी तस्करीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT