Tree Fallen  Dainik Gomantak
गोवा

Tree Collapses: मतदान करून परतणाऱ्या दाम्पत्याच्या अंगावर कोसळले झाड

गोमन्तक डिजिटल टीम

मतदान करून परतणाऱ्या दाम्पत्याच्या अंगावर वडाचे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दाम्पत्य दुचाकीवरून घरी जात असताना शिरवाडा-शिरोडा येथे आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोघेही जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दालाच्या मदतीने झाड रस्त्यातून बाजूला हटविण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती समोर आली आहे.

गोव्यातील 186 पंचायतीसाठी आज मतदान पार पडले. मोठ्या प्रमाणावर नागरिक मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी घराबाहेर पडले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले. कळंगुट येथील एका प्रभागासाठी उद्या मतदान होणार असून, येत्या 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यात सायंकाळी चार वाजेपर्यंत 70 टक्के मतदान

  • धारबांदोडा : 81.46%

  • केपे : 79.00%

  • मुरगाव : 66.17%

  • डिचोली : 82.44%

  • बार्देश : 72.05%

  • सत्तरी : 84.75

  • सासष्टी : 64.15%

  • काणकोण : 77.53%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT