Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Sanquelim : दुचाकीवरुन निघालेल्या दाम्पत्याचा अपघातात दुर्देवी अंत; 1 वर्षाच्या चिमुरड्याचा हात फ्रॅक्चर

हरवळे साखळी झाला भीषण अपघात

Rajat Sawant

Goa Accident News: हरवळे साखळी येथे एक भीषण अपघात घडला आहे. हा अपघात दुचाकी आणि ट्रक यांच्यात आज दुपारी झाला. अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यु झाला असून 1 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरवळ्याचे किशोर नाईक आणि त्यांची पत्नी व 1 वर्षांचा मुलगा दुचाकीवरुन सत्तरी होंडाच्या दिशेने जात होते. यावेळी ते सुपाची कुड-हरवळे येथे आले असता ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला.

या अपघातात नाईक दाम्पत्याचा जागीच मृत्यु झाला तर त्यांच्या एक वर्षाच्या मुलाच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहे.

अशीच एक अपघाताची घटना मंगळवारी रात्री म्हापसा येथे घडली. या अपघातात एक युवकाचा जागीच मृत्यु झाला तर लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडला.

कळंगुट- म्हापसा मार्गावर बोडगिणी येथे रात्री 11.30 च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सदाम खान (रा. काणका) या तरुणाचा मृत्यू झाला तर लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT