Ponda  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : बालशिक्षण परिषदेतर्फे फोंड्यात पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

Ponda News : यावेळी गोमंतक बाल शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. नारायण देसाई यांनी स्वागत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : फोंडा, गोमंतक बालशिक्षण परिषदेच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन निमित्त एक शिक्षक-पालक मेळावा फोंड्यात आयोजित करण्यात आला होता.

हा मेळावा परिषदेच्या खडपाबांध येथील सभागृहात (गोवर्धन इमारत, एलआयसी - दुसरा मजला) दुपारी ४ ते ५.३० या वेळेत झाला. यावेळी गोमंतक बाल शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. नारायण देसाई यांनी स्वागत केले.

यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१८ साली २४ जानेवारी हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून घोषित केल्यानंतर २०१९ पासून जगातील विविध देशांत त्या दिवशी जागृती साठी कार्यक्रम होतात.

मूलभूत, विनामूल्य व दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक बालकाचा व व्यक्तीचा अधिकार असून तोच अनेक सामाजिक समस्यांवरील उपायही आहे, हे सांगितले.

यावेळी चर्चासत्राचा विषय शाश्वत शांतीसाठी शिक्षण हा होता. विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांच्या सहभागातून जीवनोपयोगी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संघटित प्रयत्नांसाठी आजचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यासाठी शिक्षण संस्था प्रमुख पालक-शिक्षक तसेच, शिक्षक अभ्यासार्थी ,मुख्याध्यापक यांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थिती लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT