Cortalim Market Dainik Gomantak
गोवा

Cortalim Market : कुठ्ठाळी बाजार संकुलात सुसज्ज कृषी विभाग

एलिना साल्‍ढाणा : गावातील गरजूंना प्राधान्‍याने दुकाने मिळावीत; माथानींचे स्‍वप्‍न साकार

गोमन्तक डिजिटल टीम

Cortalim Market : कुठ्ठाळी बाजार संकुलात तालुका कृषी विभाग कार्यालय आणणे हे दिवंगत आमदार तथा माजी मंत्री माथानी साल्‍ढाणा यांचे स्वप्न होते आणि ते साकार झाले आहे. आता या संकुलातील दुकाने धोरणाप्रमाणे प्राधान्‍याने गावातील गरजूंना मिळाली पाहिजेत, असे मत कुठ्ठाळीच्‍या माजी आमदार एलिना साल्‍ढाणा यांनी व्यक्त केले. सदर संकुलात कृषी विभागाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन नुकतेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साल्‍ढाणा यांनी त्‍यांचे आभार मानले.

त्‍या म्‍हणाल्‍या की, कुठ्ठाळी मार्केट कॉम्प्लेक्सची योजना माथानी साल्‍ढणा यांची. ते गेल्यानंतर या प्रकल्पाचे काम काही काळ रखडले आणि २०१७ मध्‍ये ते पुन्‍हा सुरू झाले. त्यानंतर २८ जानेवारी २०१९ रोजी संकुलाचे उद्‌घाटन करण्यात आले.

कुठ्ठाळी मार्केट कॉम्प्लेक्स धोरणाचा मसुदा माजी मुख्यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांनी तयार केला होता आणि कायदेशीर दस्तावेज बनविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडल्या गेल्या होत्या. त्याची एक प्रत कुठ्ठाळी पंचायतीकडे उपलब्ध आहे, असेही एलिना साल्‍ढाणा यांनी सांगितले.

कुठ्ठाळीसह जवळच्‍या गावांना लाभ

कुठ्ठाळी मार्केट संकुलात इतर सुविधांबरोबरच शेतीसाठी एक विशिष्ट कार्यालय असावे असे माथानी साल्‍ढाणा यांना वाटायचे. कारण शेती हा कुठ्ठाळी आणि शेजारच्या गावांतील मुख्य व्यवसाय आहे.

हे कार्यालय सुसज्ज असेल आणि कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याद्वारे व्यवस्थापित केले असेल तर शेतकऱ्यांना मोठी मदत होईल, असे एलिना साल्‍ढाणा म्‍हणाल्‍या.

लोकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणारे कुठ्ठाळी मार्केट कॉम्प्लेक्स हे विशिष्ट धोरणावर चालत आहे. स्थानिक लोकांचा वास्को आणि मडगाव येथे खरेदीला जाण्‍याचा वेळ तसेच पैसाही वाचतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT