सार्वजनिक श्री दुर्गा समिती मोरजीतर्फे कोरोना योध्यांचा सन्मान  दैनिक गोमन्तक
गोवा

कोरोना काळात डॉक्टरच देवाच्या रुपात आले

कोरोना योध्यांचा सन्मान म्हणजे डॉक्टरांचा देवाच्या रुपात केलेला सन्मान असल्याचे उद्योजक बाबी बागकर यांनी सांगितले

Dainik Gomantak

Goa: कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) काळात सर्वत्र हाहाकार माजला होता, अश्या कठीण समयी ज्यांना कोरोनाची लागण झाली, त्याचे नातेवाईकही त्यांच्यापासून दूर राहायचे मात्र वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स कर्मचारी हे मात्र ईश्वराच्या रुपात रुग्णांची सेवा करून त्याना जीवदान देत होते, अश्या कोरोना योध्यांचा सन्मान म्हणजे डॉक्टरांचा देवाच्या रुपात केलेला सन्मान असल्याचे उद्योजक बाबी बागकर यांनी बागवाडा मोरजी (Morjim) येथे सार्वजनिक श्री दुर्गा समिती मोरजी तर्फे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांचा 'कोरोना योद्धा' (Corona Worrier) म्हणून गौरव केल्यानंतर बोलत होते.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, पंच प्रकाश शिरोडकर, स्वप्नील शेटगावकर, नागनाथ केरकर, श्रुती केरकर, बिंदिया बागकर, डॉक्टर सोना मयेकर, दर जोजफ फर्नांडीस , डॉक्टर रुपाली फर्नांडीस, डॉक्टर अमिता रेडकर, राजेश कासकर, सुभाष केरकर, सुदेश भोसले, वासुदेव केरकर भावेश्री बागकर, मीरा पोके, वनिता केरकर ,बिंदिया बागकर, सुधीर कान्नायिक , सतीश च्यारी. आदी उपस्थित होते. कोरोना काळात महत्वाचे योगदान दिलेल्या डॉक्टर जोजफ फर्नांडीस, डॉक्टर रुपाली फर्नांडीस, डॉक्टर अमिता रेडकर, डॉक्टर सोना मयेकर, आदींचा पाहुण्याच्या हस्ते पुष्प व स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सतीश च्यारी यांनी केले.

उद्योजक बाबी बागकर यांनी पुढे बोलताना दुर्गा उत्सव समितीचे कार्य उल्लेखनीय आहे, कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य केलेले आहे ते विसरता येणार नाही. हल्लीच मोठ्या प्रमाणात वादळ येवून मोरजी पाच दिवस अंधारात होती, त्यावेळी वीज खात्याच्या कर्मचार्यांनी युद्ध पातळीवर काम करून सत्कार सोहळा त्यांचा आयोजित केला होता, आता कोरना योद्धे म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी यांचा गौरव करून आणखी एक आदर्श घालून दिल्याचे सांगितले. मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी बोलताना मोरजीतील सर्वांनी हाउत्सव आपलाच मानून एका ठिकाणी येवून तो उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT