Corgao Panchayat Gramsabha  Dainik Gomantak
गोवा

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Corgao Gramsabha: हिंदू युवक संघटनेतर्फे आयोजित सभेचे पडसाद आज कोरगाव ग्रामसभेत उमटले.निवृत्त शिक्षक लक्ष्मण गावडे म्हणाले की, सरपंच हा पंचायत मंडळाचा विषय असतो. मात्र, हिंदू युवक सभेत हा विषय जाणे योग्य नव्हते.

गोमन्तक डिजिटल टीम

Corgao Panchayat Gramsabha

पेडणे: हिंदू युवक संघटनेतर्फे आयोजित सभेचे पडसाद आज कोरगाव ग्रामसभेत उमटले.निवृत्त शिक्षक लक्ष्मण गावडे म्हणाले की, सरपंच हा पंचायत मंडळाचा विषय असतो. मात्र, हिंदू युवक सभेत हा विषय जाणे योग्य नव्हते.

नवनिर्वाचित सरपंच अब्दुल करीम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेच्या व्यासपीठावर उपसरपंच उमेश च्यारी ,पंचसदस्य दिवाकर जाधव, अनुराधा कोरगावकर, कल्पिता कलशावकर, नीता नर्से , देविदास नागवेकर, समील भाटलेकर , पंच लौकिक शेटये, पंचायत सचिव श्रद्धा कोरगावकर तसेच निरीक्षक म्हणून देवानंद गावडे हे उपस्थित होते.

नरेश कोरगावकर म्हणाले की,कोरगाव येथे भूमिका मंदिराच्या सभागृहात जी सभा झाली त्या सभेत अब्दुल हे मुस्लिम धर्मीय सरपंच झाले, आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या तीन महिला व एक पंच सदस्याच्या चारित्र्यावर या सभेत शिंतोडे उडवले गेले.

मात्र, ज्यावेळी या सभेत काही नागरिकांनी पंच सरपंचांच्या घरी धडक देण्याचा विषय उपस्थित केला, त्याला आम्ही कडाडून विरोध केला. रात्रीच्या वेळी असे पंचांच्या घरी जाऊन त्यांना जाब विचारणे उचित नसल्याचे आम्ही सांगितले, असे उमेश च्यारी, लौकिक शेट्ये, देविदास नागवेकर व समीर भाटलेकर यांनी सांगितले.

जगदीश तोरस्कर ,लक्ष्मण गावडे, देवानंद गावडे, सर्वेश थळी, नामदेव गावडे, नरेश कोरगावकर, विकास गावडे, रामचंद्र गोसावी, प्रकाश तळवणेकर, महादेव गवंडी, राजू नर्से आदींनी सूचना केल्या. दिवाकर जाधव यांनी आभार मानले.

गावची शांतता बिघडू नये!

रूहान राजप नाईक म्हणाले की, गेल्या रविवारी कोरगाव येथे भूमिका मंदिराच्या सभागृहात हिंदू युवाशक्तीच्या वतीने सभा घेऊन सरपंचपदी अब्दुल करीम नाईक यांना निवडल्याबद्दल गंभीर आरोपही करण्यात आले. हे निंदनीय असून लोकशाहीनुसार सरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे. आम्ही या गावचे पूर्वजांपासून रहिवाशी आहोत. मात्र, बाहेरून काहीजण येऊन गावात तेढ निर्माण करत असल्यामुळे शांतता बिघडण्याची शक्यता आहे.

चर्चेनंतरच मेगा प्रकल्पांना मान्यता!

मेगा प्रकल्पांना मान्यता देण्यापूर्वी सदर विषय ग्रामसभेत ठेवावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक सुदीप कोरगावकर यांनी केली.यावर कुठलाही प्रकल्प मोठा असेल आणि गावच्या हिताचा किंवा लोकांना त्रासदायक ठरणारा असेल तर त्या प्रकल्पाबाबत चर्चा ही ग्रामसभेत होणारच आणि त्या प्रकल्पाची माहिती ग्रामसभेत ठेवूनच नंतर त्यांना परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन सरपंच अब्दुल नाईक यांनी ग्रामसभेत दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या आतापर्यंत कोणीही न सुचवलेले उपाय

त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

Ranbir Kapoor In IFFI: 'मला आजही त्या गोष्टीची लाज वाटते'; इफ्फीच्या मास्टरक्लामध्ये रणबीर केला मोठा खुलासा

Goa Live News: मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची भेट

SCROLL FOR NEXT