Cooch Behar Trophy: Dainik Gomantak
गोवा

Cooch Behar Trophy: मोठ्या आघाडीमुळे त्रिपुरा सुस्थितीत; गोव्यासाठी सामन्याच्या अखेरचा दिवस निर्णायक

गोव्याला किती धावांचे आव्हान मिळते यावर सामन्याचा निकाल अवलंबून

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy 2023: कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात अडीचशे धावांची आघाडी मिळाल्यामुळे त्रिपुराचा संघ सुस्थितीत आहे, तर सामन्याचा शेवटचा दिवस गोव्याच्या फलंदाजांसाठी निर्णायक असेल.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेच्या अ गटातील सामन्यात त्रिपुराने तिसऱ्या दिवसअखेर रविवारी 7 बाद 287 धावा केल्या. पहिल्या डावातील 35 धावांच्या पिछाडीमुळे त्यांच्यापाशी आता एकूण 252 धावांची आघाडी आहे.

त्रिपुरा संघ सोमवारी अखेरच्या चौथ्या दुसऱ्या डावात किती धावा करतो आणि गोव्याला किती धावांचे आव्हान मिळते यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.

त्रिपुराच्या दुसऱ्या डावात कर्णधार दीपजॉय देब (41) व देबांग्शू दत्ता (64) यांनी 84 धावांची सलामी दिली. नंतर प्रीतम दास (60) व सप्तजित दास (नाबाद 82) यांच्या अर्धशतकांमुळे पाहुण्या संघाच्या डावाला बळकटी प्राप्त झाली.

गोव्यातर्फे फिरकी गोलंदाज शिवांक देसाई सफल ठरला. त्याने तीन गडी टिपले.

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा, पहिला डाव ः सर्वबाद 180

गोवा, पहिला डाव ः सर्वबाद 215

त्रिपुरा, दुसरा डाव (बिनबाद 42 वरुन) ः 96 षटकांत 7 बाद 287 (दीपजॉय देब 41, देबांग्शू दत्ता 64, प्रीतम दास 60, सप्तजित दास नाबाद 82, पुंडलिक नाईक 19-2-62-2, युवराज सिंग 23-2-94-1, कौस्तुभ पिंगुळकर 11-2-37-0, शिवांक देसाई 15-5-27-3, यश कसवणकर 24-9-41-0, शंतनू नेवगी 4-0-15-1).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

SCROLL FOR NEXT