Ravi Naik  Dainik Gomantak
गोवा

मुक्तिलढ्याचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवा : कृषिमंत्री रवी नाईक

फोंड्यात क्रांतिदिन उत्साहात

दैनिक गोमन्तक

फोंडा : गोवा मुक्ती संग्रामासाठी हालअपेष्टा सोसलेल्या आणि प्रसंगी प्राणार्पण केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुक्तिलढ्यातील कार्याचा इतिहास आजच्या युवा पिढीपर्यंत पोचला पाहिजे. देशभक्तीचे हे स्फुर्लिग चेतवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांची गाथा बाल आणि युवा पिढीच्या मनावर कोरणे आवश्यक असल्याचे मत कृषिमंत्री रवी नाईक यांनी व्यक्त केले.

फोंड्यात काल शनिवारी क्रांती मैदानावर आयोजित क्रांतिदिन सोहळ्यावेळी रवी नाईक बोलत होते.

या क्रांतिदिन सोहळ्यावेळी नाईक यांच्या समवेत कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे उपस्थित होते. इतर मान्यवरांत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रोहिदास नाईक, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक इतर नगरसेवक तसेच अतिरिक्त उपजिल्हाधिकारी विकास गावणेकर, उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, पोलिस उप अधीक्षक सी. एल. पाटील तसेच लष्कराचे अधिकारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

रवी नाईक व गोविंद गावडे व इतरांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली. रवी नाईक यांनी यावेळी मानवंदना स्विकारली.

पुढे बोलताना रवी नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश प्रगतीपथावर असून सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याची गरज व्यक्त केली.

दरम्यान क्रांती मैदानाचा लष्कराच्या ताब्यात असलेला अर्धा भाग सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही रवी नाईक यांनी दिली. यावेळी विविध विद्यालयातील विद्यार्थ्यानी सुरेख देशभक्तीपर गीते सादर केली. सूत्रसंचालन गिरिश वेळगेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT