Marina Project Dainik Gomantak
गोवा

Marina Project: मरिना प्रकल्पावरून गदारोळ

Marina Project: नावशी सरपंचांना अपशब्द : प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत

दैनिक गोमन्तक

Marina Project: नावशी येथे प्रस्तावित मरिना प्रकल्पाचा विषयावर चर्चेसाठी बोलविण्यात आलेल्या कुडका-बांबोळी-तळावली ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला. सरपंच लीना तारी यांच्या विरोधात एका ज्येष्ठ नागरिकाने अपशब्द वापरल्याने सरपंचाचे समर्थक संतप्त झाल्याने वाद झाला. अखेर पोलिसांना दाखल देऊन स्थिती नियंत्रणात आणली.

मरिना प्रकल्पावर चर्चा व्हावी यासाठी ग्रामस्थांच्या मागणीवर ही ग्रामसभा नावशी गावात घेण्यात आली. ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभा सुरू झाल्यानंतर आमदार वीरेश बोरकर यांना ग्रामसभेसाठी निमंत्रित न केल्याचा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी पंचायत मंडळ आणि ग्रामस्थांमध्ये विवाद झाला. त्यात सरपंच लीना तारी यांना अपशब्द वापरण्यात आला.

अपशब्द बोलल्याने माफी मागावी अशी मागणी सरपंचांचे समर्थक तसेच नातेवाइकांनी केल्याने वाद झाला. स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा एका ग्रामस्थाने काही विधान केल्यावर पुन्हा वाद झाला. अखेर काही ग्रामस्थांनी मरिना प्रकल्पावर चर्चेचा विषय महत्त्वाचा असल्याने शांत राहण्याची विनंती केली. ग्रामसभेत मरिना प्रकल्पावर सखोल चर्चा करण्यात आली.

मरिना प्रकल्प आणि त्याच्याशी निगडित कोणत्याही गोष्टीला तीव्र विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत झाला. तसेच प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या 13 पंचायतींना प्रकल्पाविरोधात ठराव घेण्याची विनंती करण्यात आली. ठराव बंदर कप्तान खाते, मच्छीमार खाते आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

गोंयकार अगेन्स्ट मरिनाचे सुरेश पालकर यांनी प्रकल्पाविरोध करण्याचे मुद्दे ग्रामसभेत मांडले. प्रकल्पासाठी अहवाल करताना बऱ्याच गोष्टीत चुकीची माहिती देण्यात आली आहे.

पंचायत मंडळाचा प्रकल्पाला विरोध

सत्ताधारी पंचायत मंडळाने मरिना प्रकल्पाच्या विरोधात राहणार असल्याचे जाहीर केले. आम्ही लोकांच्या बाजूने उभे राहणार आहोत. लोकांना प्रकल्प नको, तर आम्हाला देखील हा प्रकल्प नको असल्याचे सरपंच आणि पंचदस्यांनी स्पष्ट केले. या ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT