म्हापसा: सध्या हटवला जाणारा बोडगेश्वर मंदिराच्या परिसराच्या शेतजमिनीवरील हेलिपॅड व रस्ता Dainik Gomantak
गोवा

म्हापशातील वादग्रस्त हेलिपॅड हटवणे सुरू

दोन महिन्यांनी काम: पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी केली होती उभारणी

दैनिक गोमन्तक

म्हापसा: फेब्रुवारीत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची म्हापशात जाहीर सभा आयोजित केली असता त्या अनुषंगाने बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात शेतजमिनीवर उभारण्यात आलेले हेलिपॅड हटवण्याचे काम सध्या तब्बल दोन महिन्यांनंतर सुरू झाले आहे.

सभेसाठी बोडगिणी परिसरात म्हापसा-पणजी मार्गाच्या बाजूने शेतात तीन हेलिपॅड बनवले होते. तसेच, मोदी यांना सभेस्थानी येण्यासाठी शेतापासून सभास्थळापर्यंत स्वतंत्र नवीन डांबरी रस्ता तयार केला होता. त्यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांकडून परवानगीही घेण्यात आली नव्हती व त्यामुळे तो विषय गोव्याच्या राजकारणात बराच वादग्रस्त ठरला होता.

पंतप्रधानांची म्हापशातील सभा जितकी गाजली, तितकीच चर्चा त्यांच्यासाठी उभारलेल्या हेलिपॅडची झाली होती. मोदींसाठी या हेलिपॅडची उभारणी शेतजमिनीत केली होती; परंतु, त्याचा प्रत्यक्षात वापर झालाच नव्हता. त्यामुळे, म्हापशातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजप व मोदी यांच्यावर टीका केली होती. काँग्रेसचे संजय बर्डे व इतरांनी आवाज उठवल्यानंतर हेलिपॅडचा रस्ता हटवण्याचे काम आता हाती घेण्यात आले आहे.

वापरायचेच नव्हते तर हेलिपॅड कशाला उभारले ?

सभेच्या ठिकाणी पंतप्रधान हे हेलिकॉप्टरने येतील, असे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले होते; मात्र, पंतप्रधान मोदी हे सडकमार्गेच कारगाडीनेच सभेसाठी आले होते. हेलिपॅडचा वापरच करायचा नव्हता तर त्याची उभारणी करून शेतकऱ्यांची हानी करण्याचे व जनतेचा पैसा विनाकारण खर्ची घालण्याचे प्रयोजन नेमके काय होते, असा सवाल तेथील शेतकरी व बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT