Goa Governor Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

राष्ट्राच्या एकात्मतेत कला, साहित्याचे योगदान मोठे: पी. एस. श्रीधरन पिल्लई

कुमाऊ लिटररी महोत्सवाचे आयोजन पणजीत करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राष्ट्राची अखंडता आणि एकात्मता राखण्यासाठी कला आणि साहित्य क्षेत्राचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले आहे. त्यांच्या हस्ते दोन दिवसीय ‘कुमाऊ लिटररी’ महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

इंडियन सिनेमा हेरिटेज फाउंडेशन आणि गोवा मनोरंजन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कुमाऊ लिटररी महोत्सवाचे आयोजन पणजीत करण्यात आले आहे. यासाठी देशभरातील मान्यवर विचारवंतांनी या महोत्सवाला हजेरी लावली आहे. हा देशातील पहिला प्रवासी साहित्य महोत्सव आहे जो विविध मानवी कलांवर प्रकाशझोत टाकत आहे.

केएलएफला श्याम मेटॅलिक्स आणि लक्ष्मी कुप्पुस्वामी ट्रस्टचे समर्थन मिळाले आहे. येथे कला, सिनेमा आणि साहित्य या विषयांवर मनोरंजक आणि माहितीपूर्ण सत्रे सादर केली जाणार आहेत. डॉ. विवेक देबरॉय बीज भाषणात म्हणाले, की संस्कृती, भौगोलिक स्थिती, प्रशासकीय आणि शासन कौशल्य यांचे ज्ञान मिळवण्यासाठी प्राचीन धर्मग्रंथ आणि ऐतिहासिक साहित्य वाचले पाहिजे.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुमंत बत्रा, चित्रपट निर्माते राहुल रवैल यांची भाषणे झाली. इएसजीच्या महाव्यवस्थापक मृणाल वाळके यांनी आभार मानले.

गोव्याच्या भाषेत मोठे साहित्य

गोवा अजूनही एक असे ठिकाण आहे, जिथे लोक अजूनही वाचण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी वेळ काढतात. गोव्याची स्वतःची अशी समृद्ध भाषा आहे, ज्यामध्ये मोठे साहित्य लिहिले गेले आहे आणि या साहित्याची नक्कीच गरज आहे. लोकांना हे साहित्य वाचता यावे म्हणून ते अधिक अनुवादित केले, असे बत्रा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT