Contract Teachers Dainik Gomantak
गोवा

सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी शिक्षकांचा विधानभवनावर मोर्चा

काम करणाऱ्या 129 शिक्षिका आपणाला सरकारची सेवेमध्ये कायम करावे या मागणीसाठी अनेक वर्षे आंदोलन करत आहेत .

दैनिक गोमन्तक

पणजी: सेवेत कायम करावे या मागणीसाठी आझाद मैदानावरुन (Azad Maidan) विधानसभेकडे मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंत्राटी शिक्षकांना (Contract Teachers) पोलिसांनी (Police) अटक केली व त्यांना आगशी येथे नेले. याबाबत सविस्तर वृत्त असे की गेली पंधरा वर्षे कंत्राटी पद्धतीवर पेरा शिक्षक तथा शिक्षण सेविका म्हणून काम करणाऱ्या 129 शिक्षिका आपणाला सरकारची सेवेमध्ये कायम करावे या मागणीसाठी अनेक वर्षे आंदोलन करत आहेत .

त्यांच्या वेतनात जरी वाढ करण्यात आली असली तरी त्यांना सेवेत कायम करण्यात आलेले नाही. त्यामुळे आपणाला सेवेत कायम करावे या मागणीसाठी आज गोवा विधानसभेवर मोर्चा नेण्यासाठी आझाद मैदान येथे हे शिक्षक जमले होते. मोर्चाला परवानगी काढण्यात न आल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना तिथेच अटकाव केला. पोलिसाशी बराच वेळ चर्चा केल्यानंतर पेरा शिक्षकांनी पोलिसांना न जुमानता विधानसभेवर मोर्चा नेण्यासाठी आझाद मैदानाच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक करून वाहनांमध्ये बसवले व आगशी पोलीस स्थानकावर नेले.

पेरा शिक्षकांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या विविध नेत्यांनी पाठिंबा व्यक्त केला होता. मात्र आज आंदोलन करण्यास व मोर्चाच्या वेळी विरोधी पक्षाचा नेता व कार्यकर्ता पेरा शिक्षकासोबत आला नाही. काही झाले तरी आम्ही आंदोलन पुढे नेणारच. व आम्हाला सेवेत कायम करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. अशी माहिती पेरा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा स्मिता देसाई यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT