Consumer complaint news Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa District Commission: ‘दक्षिण गोवा ग्राहक’चा ढिसाळ कारभार! अध्‍यक्षांना राज्य आयोगाने बजावली नोटीस

South Goa District Commission Hearing: आता या प्रकरणात दक्षिण गोवा आयोगाच्‍या अध्‍यक्षांना नोटीस देण्‍यात आली असून पुढच्‍या आठवड्यात त्‍यांचीही सुनावणी होणार असल्‍याची माहिती सूत्रांकडून प्राप्‍त झाली आहे.

Manish Jadhav

Consumer Complaints South Goa District Forum State Commission Hearing

मडगाव: दक्षिण गाेवा ग्राहक तक्रार निवारण जिल्‍हा आयोगाच्‍या एकूणच कारभाराविषयी तीन ग्राहकांनी नागरी पुरवठा खात्‍याकडे केलेल्‍या तक्रारी सध्‍या राज्‍य आयोगासमोर सुपुर्द करण्‍यात आल्‍या असून राज्‍य आयोगाने या तिन्‍ही ग्राहकांची बाजू 9 एप्रिल रोजी ऐकून घेतली. आता या प्रकरणात दक्षिण गोवा आयोगाच्‍या अध्‍यक्षांना नोटीस देण्‍यात आली असून पुढच्‍या आठवड्यात त्‍यांचीही सुनावणी होणार असल्‍याची माहिती सूत्रांकडून प्राप्‍त झाली आहे.

दक्षिण गोवा जिल्‍हा आयोगाच्‍या विरोधात जोजेफ वाझ, प्रियांका तळावलीकर आणि विजय कपूर या तीन ग्राहकांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्‍यवहार खात्‍याकडे तक्रार दिली होती. दक्षिण गोवा जिल्‍हा आयाेगाकडून ग्राहकांना (Customers) तक्रारी दाखल करण्‍यासाठी पोषक असे वातावरण नाही आणि या आयोगाकडे तक्रार दाखल केल्‍यास ती आयाेगासमाेर मांडण्‍यासाठी ग्राहकाने वकिलांची नेमणूक करावी यासाठी दबाव आणला जातो, असे म्‍हटले होते.

विधानसभेतही चर्चा

या तक्रारीची नागरी पुरवठा खात्‍याने प्राथमिक चाैकशी केल्‍यानंतर हे प्रकरण राज्‍य आयाेगासमोर दाखल केले होते. त्‍यानुसार राज्‍य आयाेगाने तिन्‍ही ग्राहकांना नोटीस पाठवून त्‍यांना आयोगासमोर बोलावून 9 एप्रिल रोजी त्‍यांची बाजू ऐकून घेतली होती. दक्षिण गोवा (South Goa) ग्राहक आयोगाचा हा मुद्दा विधानसभेतही चर्चेत आला हाेता. यावेळी विजय सरदेसाई यांनी या जिल्‍हा आयाेगाचे काम योग्‍यरितीने हाताळले जात नाही, अशी टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT