Cortalim Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: गणेश मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात

कुठ्ठाळीतील मूर्तीकार उल्हास वामन नाईक यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक

वास्को: यंदा 31 ऑगस्टपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे संपूर्ण गोवा तसेच महाराष्ट्रात व भारताच्या इतर काही भागात मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे व शेवटच्या टप्प्यात पोचले आहे. तसेच सुबक गणेश मुर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत.

(Construction of Ganesha idol at cortalim in final stage)

कुठ्ठाळीतील मूर्तीकार उल्हास वामन नाईक हे गेली कित्येक वर्षे गणेश मूर्ती करीत आहे. त्यांची मूर्ती करण्याची आवड त्यांनी कला म्हणून अंगी जोपासलेली आहे. व्यवसायात सिव्हील कॉन्ट्रॅक्टर असूनही दरवर्षी गणेशचतुर्थी तोंडावर येण्याअगोदर गणेशमूर्ती बनविण्याचे काम ते स्वतः सुमारे तीन महिने अगोदर हातात घेतात. त्यांच्याशी चर्चा करून गणेशमूर्ती बनविण्याची त्यांच्या अंगी कशी काय आली याच्याविषयी त्यांच्या कलेची जाणून घेतलेली ही माहिती.

उल्हास वामन नाईक हे कुठ्ठाळीतील गणेश मूर्ती बनविण्याचे काम करीत असले तरी ते सांगतात की, त्याच्या वडिलांनी गणेशमूर्ती बनविण्याचे काम स्वतः लहानपणीच सुरू केले होते. सुमारे 80 वर्षापूर्वी त्यांचे वडिल वामन नाईक कासावलीत राहात होते. त्यावेळीपासून त्यांचे वडील कुठ्ठाळीत जाऊन गणेशमूर्ती बनवित होते.

त्यावेळी त्यांचे वडिल एक छंद म्हणून गणेश मूर्ती बनवून गणेश चतुर्थीसाठी गणेश भक्ताना उपलब्ध करून देत होते. ते फक्त एक श्रीफळ, थोड तांदुळ व वीडा असा काय तो मूर्तीचा परतावा देत होते. वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न वडिलांचे काम त्यांच्या वडिलांनी सुरू केलेले. गणेशमूर्ती बनविण्याचे काम मी आज पुढे नेत आहे, असे उल्हास नाईक सांगतात.

खरे तर गणेशमूर्ती तयार करण्यासाठी सुरुवात होते ती वटपौर्णिमेच्या दिवसापासून. वटपौर्णिमेला पहिली गणेशमूर्ती करून त्यादिवशी त्या मूर्तीची पूजा करून गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला पूर्वी सुरुवात केली जात होती. तशी सुरुवात आजपर्यंत आपणही करीत आहे. त्यादिवशी गणेशमूर्तीची पूजा केली की गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची त्यादिवशी पूजा केली जाते.

वट पौर्णिमेचा दिवस या कामाला आमचे आजोबा, वडिल पवित्र मानत आणि आपले काम सुरू करण्यात हाच दिवस योग्य त्यांना वाटत असे. माझाही तसाच कल असून परंपरेच्या दिशेनेच मीही मूर्ती बनविण्याचे काम करीत आहे.

या कामात फायदा काय होतो याकडे कधीच उल्हास यांनी पाहिले नाही. गणेशमूर्ती बनविताना नक्कीच समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. ही कला व वारसा सांभाळून ठेवायला पाहिजे असे त्यांना वाटते. मशिनवर केलेले पीओपी गणेशमूर्ती बाजारात खूप येणार त्याला फार महत्व नाही. सरकारचीही त्याला परवानगी नाही. आपल्या हातानी स्वत: तयार केलेल्या चिकणमातीच्या गणेशमूर्त्यांना गणेश उत्सव पूजनात खूपच महत्व आहे. हे महत्व असेच टिकून राहण्यासाठी ही कला अशीच पुढे नेण्याचा निर्धार उल्हास नाईक यांचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT