damage road problem in goa Dainik Gomantak
गोवा

तळपण-गालजीबाग रस्त्याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

गालजीबाग रस्त्याचा सुमारे तीनशे मीटरचा भाग नदीच्या पात्राला समांतर

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैंगीण पंचायत क्षेत्रातील तळपण- गालजीबाग अंतर्गत रस्ता खचू लागला आहे, मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते दुर्लक्ष करीत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.

सादोळशे ते तळपण रस्ता तळपण नदीच्या पात्राला समांतर आहे. तर गालजीबाग रस्त्याचा सुमारे तीनशे मीटरचा भाग नदीच्या पात्राला समांतर नदी काठावरून जातो. या दोन्ही रस्त्यांवरून चाररस्ता ते माशे पर्यंतचा मनोहर पर्रीकर बगल चौपदरी रस्ता बांधताना मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी झाली.

त्याचप्रमाणे आता हॉटमिक्स डांबरीकरणासाठीही याच मार्गावरून वाहतूक होत आहे, त्यामुळे तळपण रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. ते पावसाळ्यापूर्वी न बुजविल्यास पावसाळ्यात गंभीर समस्या उद्‍भवण्याची शक्यता येथील रूद्रेश नमशीकर यांनी व्यक्त केली आहे.

गालजीबाग नदी पात्राला समांतर असलेल्या फोंडले येथील रस्त्याच्या कडेला नदी काठावर दूरध्वनीचे केबल घालण्यासाठी चर खणल्याने आधीच खचलेला रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडा नाही, त्यामुळे वाहने थेट नदीच्या पात्रात कोसळण्याची भीती आहे,असे येथील स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

RGP Controversy: ‘त्‍या’ दहाजणांचे निलंबन मागे; आरजीपीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष बोरकर यांच्‍याकडून आदेश जारी

धरणात विद्यार्थिनींसोबत आंघोळ अन् VIDEO व्हायरल! प्राचार्याच्या कृत्यावर संताप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये, थेट निलंबनाची कारवाई

Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

Goa Nightlife: बर्च अग्निकांडांत 25 जणांचा होरपळून मृत्यू; तरीही गोव्याची नाईट लाईफ बिनधास्त! धडा कधी शिकणार?

आश्चर्यच! चार हात आणि चार पायांसह बाळाचा जन्म; पाहताच कुटुंबीयांना बसला धक्का, डॉक्टरांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT