Tea Stall Dainik Gomantak
गोवा

बाकडे हटवून लावले चहाचे स्‍टॉल्‍स!

म्‍हापसा कदंब महामंडळाकडून बांधकाम : गोवा कॅनच्‍या पाठपुराव्‍याला यश.

दैनिक गोमन्तक

म्हापसा : म्हापसा (Mapusa) बसस्थानकावर खुद्द कदंब महामंडळाकडूनच बेकायदा बांधकाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बसस्थानकाची पाहणी सोमवार 16 रोजी आयोजित केल्यानंतर त्यावेळी महामंडळाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आज बुधवार 17 रोजी दुसऱ्यांदा पाहणी झाली. ‘गोवा कॅन’ने या विषयाचा आग्रहपूर्वक पाठपुरावा केल्याने अखेर महामंडळाचा अधिकारी दुसऱ्या पाहणीवेळी उपस्‍थित राहिला आणि वस्‍तुस्‍थिती उघड झाली.

दुसऱ्या वेळी स्वयंचलित वाहन निरीक्षक प्रकाश वाडकर, कदंब वाहतूक महामंडळाचे उपसरव्यवस्थापक एन.जी नाईक तसेच गोवा कॅनचे कार्यकर्ते जुलिया डिसोझा, ओवन ब्रागांझा आणि नॅन्सी फर्नांडिस उपस्थित होते. प्रवाशांसाठी बसस्थानकाच्या आवारात असलेली जागा तसेच तेथील दोन बाकडे यावर अतिक्रमण का करण्यात आले, असा सवाल कार्यकर्त्यांनी एन. जी नाईक यांना केला.

स्‍टॉल भाडेतत्त्‍वावर

उपलब्ध माहितीनुसार, पणजी, मडगाव आणि म्हापसा येथील बसस्थानकांवर चहाचे स्टॉल उभारण्यासाठी तेथील जागा भाडेतत्त्वावर फ्रेंचायजी (Franchise) उपलब्ध करून देण्याचा निर्णय कदंब वाहतूक महामंडळाने घेतलेला आहे. तथापि, यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांची सोय या बाबतीत नियमभंग झाल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी रोलंड मार्टिन्स यांनी वाहतूक खात्याच्या प्रशासकीय विभागाच्या उपसंचालक नॅन्सी फर्नांडीस यांच्यासमोर तक्रार केली होती व त्यासंदर्भात ही दुसऱ्यांदा पाहणी करण्यात आली होती.

परवानगी घेतलीच नाही

प्रवाशांसाठी असलेल्या जागेत स्टॉलची (Tea Stall) उभारणी करणे, त्यासंदर्भात महामंडळाने वाहतूक खात्याकडून परवानगी न घेणे, अग्निशमन दल व म्हापसा पालिका यांच्याकडून बांधकामाबाबत परवाने न घेणे, बसस्थानकाच्या रचनेत बदल करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मान्यता न घेणे. अशा कृती महामंडळाकडून घडलेल्या आहेत.

तीन दुकाने थाटली

शासकीय अधिकाऱ्यांनी बसस्थानकावरील अतिक्रमणांबाबत मोजमाप केले. या बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या दोन बाकड्यांच्या ठिकाणी तीन दुकाने थाटण्यात आली, असे यावेळी आढळून आले. त्या ठिकाणी नियमबाह्य अशी चहाविक्री दुकाने कार्यान्वित केली जाणार असल्‍याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

...म्‍हणून कदंबच्‍या प्रतिनिधींनी फिरवली पाठ

यासंदर्भात बोलताना गोवा कॅनचे संघटक रोलंड मार्टिन्स म्हणाले, की विनंती करूनही कदंब वाहतूक महामंडळाचे प्रतिनिधी पहिल्या पाहणीवेळी उपस्थित राहिले नव्हते. याचे कारण म्हणजे तेच स्वत: या बेकायदा अतिक्रमण प्रकरणात गुंतलेले आहेत. यासंदर्भात विभागीय वाहतूक अधिकारी विष्णू शेटगावकर यांना सातत्याने फोन करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT