Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: कॉन्स्टेबलने दिला आदेश आणि त्याने केली चोरी...

सराईत चोर फैझान सय्यदने पाडले पितळ उघडे

दैनिक गोमन्तक

सराईत चोर फैझान सय्यद याला अटक केल्यानंतर त्याने धक्कादायक माहिती दिली. कॉन्स्टेबल विकास कौशिक हा चोऱ्या करण्यास सांगत होता. चोरलेला माल तो स्वतःकडे ठेवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर ती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावेळी विकास हा फातोर्डा पोलिस स्थानकात होता.

या प्रकरणी संशयित फैझान सय्यद याची सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा कॉन्स्टेबल कौशिक याने त्याला उत्तर गोव्यातच चोऱ्या करण्यास सांगितले होते. दक्षिण गोव्यात चोऱ्या करण्यास त्याला प्रतिबंध केला होता.

वारंवार तो त्याला फोन करायचा. कॉन्स्टेबलने हे प्रकार दडवण्यासाठी चोरीचा मोबाईल वापरत होता व त्यामध्ये असलेले सिमकार्डही चोरीचे होते. तो व्हॉट्सअपवरून संशयित फैझान याच्याशी चॅट करायचा व त्यानंतर चॅट मेसेजिस डिलिट करायचा.

तो कोणतेही पुरावे ठेवत नव्हता. संशयित फैझान याला अटक करण्यात आली तेव्हा त्याने अधिकाऱ्यांना फोन करून संशयिताची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याने या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता.

त्याने केलेला अप्रामाणिकपणा व गैरवर्तणूक ही गंभीर बाब असल्याने त्याच्या या कृत्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. अशा पोलिसांना खात्यामध्ये ठेवणे योग्य वाटत नाही. त्यामुळे त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गुन्हेगारांशी संगनमत असलेल्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल असे स्पष्ट संकेत या आदेशातून देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT