Arrest Dainik gomantak
गोवा

Goa Crime: संशयित कॉन्स्टेबलचा भाऊ अजूनही फरार! दोघी बहिणींना न्यायालयीन कोठडी; 'तो' दुर्दैवी व्हिडिओ व्हायरल

Goa Crime News: गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा शाखेने अटक केलेल्या प्रीती चव्हाण (२३) आणि तनिष्का चव्हाण (२१) या दोघा महिला कॉन्स्टेबल्सची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Constable Prathmesh Gawade Death Case

पणजी: वास्को रेल्वे पोलिस स्थानकातील पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे याने जुवारी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. गावडे याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा शाखेने अटक केलेल्या प्रीती चव्हाण (२३) आणि तनिष्का चव्हाण (२१) या दोघा महिला कॉन्स्टेबल्सना पोलिस कोठडीसाठी उभे केले असता पणजी प्रथम श्रेणी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या प्रकरणातील संशयित महिला कॉन्स्टेबल तनिष्काचा भाऊ आकाश हा फरारी असून क्राईम ब्रँचचे पथक त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

क्राईम ब्रँचने संशयित प्रीती व तनिष्का चव्हाण या दोघा चुलत बहिणींना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान त्यांच्या या उत्तराने समाधान होत नसल्याने सखोल चौकशी करण्यासाठी या दोघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती क्राईम ब्रँच पोलिसांनी केली होती. संशयितांचे मोबाईल्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत व जबानीही नोंद केली आहे. त्यामुळे त्यांना पोलिस कोठडी देण्याची आवश्‍यकता दिसत नाही, असे निरीक्षण करत न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी ६ रोजी ठेवली आहे.

व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल

पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे यांनी शुक्रवार, २५ ऑक्टोबर रोजी जुवारी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ रेकॉर्ड करत प्रीती चव्हाण आणि तनिष्का चव्हाण या दोन महिला पोलिस कॉन्स्टेबल व भाऊ आकाशने चालवलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर बराच व्हायरल झाला होता. याची दखल घेऊन गुन्हा दाखल केला होता. घटना घडल्यानंतर संशयित फरार झाले होते. संशयितांचा भाऊ फरार असून गुन्हा शाखेचे पथक त्याच्या शोध घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT