GMC sub-way Dainik Gomantak
गोवा

संभाव्य धोका लक्षात घेत गोमेकॉजवळील सब-वे पोलिसांनी वाहतुकीसाठी केला बंद

संभाव्य धोका लक्षात घेत गोवा पोलिसांनी गोवा मेडिकल कॉलेजजवळील हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात केला आहे. त्यामुळे मोठ्या जीवितहानीचा धोका टळला आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यामध्ये पावसाने सकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. संपूर्ण राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे प्रवास करताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मुसळधार पावसामुळे गोवा मेडिकल कॉलेजजवळील सब-वे मध्ये ही पाणी भरले होते. हे पाणी सब-वे मध्ये वीज पुरवठा करणाऱ्या पॅनेलपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तिथल्या पाण्यामध्ये विजेचा प्रवाह असण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्या पाण्यातून जर कुणी गेले असते त्यांना विजेचा शॉक लागण्याची शक्यता होती.

मात्र संभाव्य धोका लक्षात घेत गोवा पोलिसांनी गोवा मेडिकल कॉलेजजवळील हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात केला आहे. त्यामुळे मोठ्या जीवितहानीचा धोका टळला आहे.

दरम्यान, राजधानी पणजीत ठिकठिकाणी पाणी साचलं असतानाच उत्तर गोव्यालाही पावसाने झोडपून काढलं आहे. पार्से खाजनगुंडो परिसरातही शेतीला पूर्णपणे तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून वाहने चालवतानाही अडचणी येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT