Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

मायकल लोबोंच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध

लोबोंना काँग्रेसमध्ये घेताना वरिष्ठ नेत्यांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : कळंगुटचे भाजप आमदार आणि मंत्री मायकल लोबोंनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. लोबो भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. मात्र आता कळंगुट काँग्रेस कमिटीने मायकल लोबोंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

मायकल लोबोंना काँग्रेसमध्ये (Congress) घेण्याच्या निर्णयात स्थानिक काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. कळंगुट ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बेनेडिक्ट डिसोझा यांनी लोबोंच्या काँग्रेस प्रवेशाला कडकडून विरोध केला आहे. कळंगुटमधील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार अंजिलिओ फर्नांडिस यांनीही लोबोंना विरोध दर्शवला आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात न घेतल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे गोवा विधानसभेच्या (Goa Assembly Election) तोंडावर काँग्रेसमध्ये बंडाळी होते का अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मायकल लोबोंचा (Michael Lobo) काँग्रेस प्रवेश वादात सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashid Khan: 'मी अफगाणिस्तानसाठीच खेळणार!', राशिद खाननं नाकारलं भारताचं नागरिकत्व; आयपीएलच्या रणधुमाळीत मोठा खुलासा

डिचोलीत 'मानकुराद'ची चव किंचित झाली 'गोड', दर आवाक्यात; मानकुराद 1000 ते 1200 तर हापूस 500 रुपये डझन

शिरगावात 'मॉक ड्रिल' यशस्वी; मात्र नियोजनात मोठी विसंगती, दीड हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग; जेवणाची व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ

Jammu and Kashmir Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 10 जणांचा मृत्यू

Lairai Jatra: 'लईराई देवी'च्‍या जत्रोत्सवासाठी शिरगाव सज्ज, प्रशासन सतर्क; होमकुंडाचे काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT