Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोव्यातील दोन्ही जागा आम्हीच जिंकणार, काँग्रेसला विश्वास

Goa Congress: पाटकर म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान होत नाही, तोच ‘एक्झिट पोल’ येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress

‘एक्झिट पोल’ने गोव्यातील दोन्ही लोकसभेच्या जागांवर भाजपचेच उमेदवार जिंकून येणार असल्याचे दाखविले असले, तरी कर्नाटक - तेलंगणाचे ‘एक्झिट पोल’ पाहता हेही फसवे निघतील. गोव्यातील दोन्ही जागांवर काँग्रेसचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सोमवारी व्यक्त केला.

निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे मीडिया विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा जिल्हाप्रमुख वीरेंद्र शिरोडकर, दक्षिण गोवा जिल्हाप्रमुख सावियो डिसिल्वा यांची उपस्थिती होती.

पाटकर म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान होत नाही, तोच ‘एक्झिट पोल’ येत आहे. त्यावरून भाजपच जनतेला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट दिसून आले. विरोधकांचे जे मतमोजणी केंद्रातील प्रतिनिधी आहेत, त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न यातून होत आहेत.

'मतदान प्रतिनिधींच्या खच्चीकरणाचा डाव'

लोकसभा निवडणुकीत ‘एक्झिट पोल’मध्ये 350 जागा भाजपला मिळणार असल्याचे दाखविण्यात आले, परंतु ही निवडणूक लोकांची असल्याने लोकांचा जो कल आहे, त्यावरून इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल.

तरीही भाजप विरोधी पक्षांच्या मतदान प्रतिनिधींचे खच्चीकरण करीत आहे. मतमोजणी केंद्रावरील अधिकाऱ्यांनी अत्यंत निष्पक्ष राहून काम करावे, कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT