Goa Congress Gomantak Digital Team
गोवा

Margao News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मडगावात मिळेल आघाडी : सावियो

योग्य रणनीती आखून राजकीय हालचाली गतिमान करणार

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: दिगंबर कामत हे मडगावकरांना आजपर्यंत मूर्ख बनवत आले आहेत; पण आता त्यांचा खरा चेहरा मडगावकरांना कळून चुकला आहे. त्याची प्रचीती येत्या लोकसभा निवडणुकीत येईल. यावेळी काँग्रेसचा उमेदवार मडगावात आघाडी घेईल, असा दावा दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी केला आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कामत यांना फक्त स्वतःच्या कुटुंबाची काळजी आहे. आपल्या मुलाला ते राजकीय वारस म्हणून पुढे आणत आहेत, हे लपून राहिलेले नाही. त्यांनी त्यांच्यासोबत पक्षांतर केलेल्यांना आश्र्वासने देऊन फसविले आहे.

ते दबाव आणत असल्यामुळे अनेक नगरसेवक बिथरले आहेत. ते काँग्रेसच्या संपर्कात असून आम्ही योग्य रणनीती आखून राजकीय हालचाली गतिमान करणार आहोत. रावणफोंड ओव्हर ब्रीज व संलग्न रस्त्याच्या रुंदीकरण पायाभरणी कार्यक्रम पत्रिकेवर उपनगराध्यक्षा दीपाली सावळ, स्थानिक नगरसेवकाचे नाव का छापले नाही, असा सवाल केला. कामत यांना मॉडेल मडगाव नगरसेवकांबाबत आदर नसल्याचे स्पष्ट होते, असाही टोल डिसिल्वा यांनी लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT