Congress Yatra On Goa Revolution Day Dainik Gomantak
गोवा

गोवा क्रांती दिनी काँग्रेस महागाई, बेरोजगारी विरोधात उठवणार आवाज; दोनापावल ते आझाद मैदान यात्रेचे आयोजन

भाजप सरकार गोव्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बेरोजगारीमध्ये गोवा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे - काँग्रेस

गोमन्तक डिजिटल टीम

Congress Yatra On Goa Revolution Day: गोवा क्रांती दिनी काँग्रेस महागाई, बेरोजगारी आणि राज्यातील इतर समस्यांविरोधात आवाज उठवणार आहे. काँग्रेसने 18 जून ऱोजी दोनापावल ते आझाद मैदान पणजी येथे यात्रा आयोजित केली आहे.

भाजप सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरला आहे. असा आरोप युवक काँग्रेसच्या गोव्याचे प्रभारी सचिव रिची भार्गव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस विजय भिके, केनिशा मिनेझिस, महेश नादर, रिनाल्डो रुझारियो आणि देवसुरभी यदुवंशी उपस्थित होते.

"भाजप सरकार गोव्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बेरोजगारीमध्ये गोवा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सरकारचे महागाईवर कोणतेही नियंत्रण नाही. निवडणूकी दरम्यान तीन मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजप सरकारने अद्याप ही योजना चालीस लावलेली नाही. त्यांच्याकडे रोजगार निर्माण करण्याचे धोरण नाही," असे रिची भार्गव म्हणाल्या.

"भाजप कडून स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील घोटाळ्यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि सरकार चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत दाखवत नाही. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांपासून भाजप पळ काढत आहे." असेही त्या म्हणाल्या. रिची भार्गव यांनी यावेळी सर्वांना यात्रेत सामील होण्याचे आवाहन केले.

"युवकांना नोकऱ्या देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपने काहीही केले नाही, तरीही ते ही नउ वर्षे साजरा करत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पात भ्रष्टाचार झाला आहे, मात्र सरकार त्याची चौकशी करायला तयार नाही. यावरून ते घोटाळ्यात कसे गुंतले आहेत, हे सिद्ध होते" असे विजय भिके म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT