Priyanka Gandhi Dainik Gomantak
गोवा

प्रियंका गांधी उद्या गोव्यात !

गोव्यातह विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly elections) धामधूम पाहायला मिळत आहेत.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यासाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यातही विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly elections) धामधूम पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच गोव्यात कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने (Goa Forward Party) युती करत सत्तेत असणाऱ्या भाजपला धक्का दिला होता. यातच आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी- वढेरा (Priyanka Gandhi) उद्या गोव्याला भेट देणार आहेत. जिथे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत. दरम्यान त्या विविध कार्यक्रमांना संबोधित करणार आहेत. तसेच प्रियंका राज्यातील युवक आणि महिलांशी संवाद साधणार असल्याचे देखील पक्षातील बड्या नेत्याने बुधवारी सांगितले. त्याचबरोबर प्रियंका गांधी दक्षिण गोव्यातील क्वेपेम विधानसभा मतदारसंघातील मोरपिर्ला गावात महिलांशी संवाद साधणार आहेत, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय राजधानीत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांची भेट घेतल्यानंतर लगेचच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर प्रदेश आणि गोव्यात काँग्रेससोबत निवडणूकपूर्व युती करण्याचे संकेत दिले होते. दोन्ही राज्यांमध्ये पक्ष एकत्र काम करण्याचा विचार करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. नवी दिल्लीत प्रियांका गांधी यांच्यासोबत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका तासाच्या बैठकीनंतर शिवसेना नेत्याचे हे वक्तव्य आले आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

तसेच, एएनआयशी बोलताना राऊत म्हणाले, "ही एक सकारात्मक बैठक होती. आम्ही उत्तर प्रदेश आणि गोव्यात एकत्र काम करण्याचा विचार करत आहोत. देशाच्या राजकारणावर चर्चा करण्यासोबतच उत्तरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही चर्चा झाली. शक्य झाल्यास शिवसेना आणि काँग्रेस उत्तर प्रदेश आणि गोव्यातील विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. " "आम्हाला काँग्रेससोबत एकत्र काम करायचे आहे आणि काही होते का ते बघू," असेही ते म्हणाले.

याआधी मंगळवारी शिवसेनेचे खासदार म्हणाले होते की, काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी शक्य नाही आणि विरोधकांच्या चेहऱ्यावर नंतर चर्चा होऊ शकते. त्यांनी मंगळवारी नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

SCROLL FOR NEXT