Congress Protest in Canacona Dainik Gomantak
गोवा

पोळे तपासणी नाक्यावर कर्नाटकमधून येणारी वाहनं अडवली

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मार्गावर काहीकाळ तणाव

दैनिक गोमन्तक

काणकोण : पोळे तपासणी नाक्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकमधून येणारी वाहनं अडवल्याने काहीकाळ तणाव पाहायला मिळाला. कर्नाटकच्या माजाळी तपासणी नाक्यावर आरटीपीसीआर निगेटिव्ह दाखला सक्तीचा केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन केलं

कर्नाटकमध्ये (Karnataka) गोव्यातून प्रवेश करणाऱ्या वाहनांना आरटीपीसीआर सक्तीची करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे चाचणीचा निगेटिव्ह अहवाल नसतो, अशा प्रवाशांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यापासून मज्जाव करण्यात येतो. त्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळट सीमेवरच थांबावे लागते किंवा तसंच परतावे लागते. याच्या निषेधार्थ काँग्रेसने काणकोणजवळील पोळे तपासणी नाक्यावर कर्नाटकमधून येणारी वाहने रोखली.

काँग्रेसच्या (Congress) आक्रमक भूमिकेमुळे पोळे तपासणी नाक्यावर काहीकाळ तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान गोव्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं चित्र आहे. कर्नाटक सरकारच्या नियमांमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप होत असल्याचा आरोप होत आहे. पोळे तपासणी नाक्यावर वाहने अडवून आरटीपीसीआर (RTPCR) निगेटिव्ह दाखला नसलेल्यांना राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT