Yuri Alemao  Dainik Gomantak
गोवा

'गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर 80 रुपयांवर आणा'

गोमंतकीयाप्रती संवेदनशीलता दाखविण्याची युरी आलेमाव यांची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव : असंवेदनशील भाजप सरकारने पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलींडरचे दर वाढवून सामान्य जनतेवर आर्थिक बोजा टाकणे सुरुच ठेवले आहे. गोव्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यानी भाजपचा प्रोपोगांडा करणाऱ्या 'काश्मीर फाईल्स' चित्रपटाला 'टॅक्स फ्री' जाहीर करण्याची घोषणा केली. डॉ. प्रमोद सावंतानी आता गोमंतकीय जनतेपोटी माणुसकी दाखवून पेट्रोल आणि डिझेलचे दर रुपये 80 प्रती लिटर पर्यंत नियंत्रित करावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

मागील चार दिवसात घरगुती गॅसची किंमत 50 रुपयांनी वाढविण्यात आली तर पेट्रोल आणि डिझेलचे दर आज तिसऱ्यांदा वाढविण्यात आले. आज पेट्रोल व डिझेल 80 पैसे लिटर महाग झाले हे धक्कादायक आहे. भाजपची असंवेदनशीलता आणि बेजबाबदारपणा यातून उघड होतो अशी टीका युरी आलेमाव यांनी केली आहे.

कॉंग्रेस पक्षाचे नव्यानेच निवडून आलेले आमदार हे तरुण असून, लोकविरोधी निर्णयांविरूद्ध सरकारला (Goa Government) जाब विचारण्याची धमक आमच्यात आहे हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे. सरकारने गोमंतकीयांच्या संवेदनांशी आणि भावनांशी खेळू नये. आगामी विधानसभा अधिवेशनात आम्ही जनतेचा आवाज बनून सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

कॉंग्रेस पक्षाने 'रोड मॅप टू गोवा व्हिजन -2035' जाहीरनाम्यात पेट्रोल व डिझेलचे दर रु. 80 प्रती लिटरवर नियंत्रित करण्याचे वचन दिले होते. आमचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी योग्य अभ्यास करुनच सदर वचन जाहीरनाम्यात (Manifesto) टाकले होते. वॅट कमी करुन, पॅट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे शक्य असून, त्यासाठी सत्तेत असलेल्यांकडे लोकांप्रती संवेदना दाखविण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस (Congress) पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात जे शक्य आहे, तेच देण्याचे वचन लोकांना दिले होते. आज गोमंतकीयांनी उभे राहून लोकविरोधी निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना जाब विचारला पाहिजे, असे आवाहन युरी आलेमाव यांनी केले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT