Carlos Ferreira Congress MLA  Dainik Gomantak
गोवा

South Goa Collector: जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार! आमदार कार्लुस फेरेरा यांचा इशारा

इव्हेंटसाठी कर्ज काढता, मग प्रजासत्ताक दिनासाठी पैसे नसल्यावरून सवाल

Akshay Nirmale

South Goa Collector: हजारो कोटींची कर्जे घेऊन सरकारच्या आणि स्वपक्षाच्या कार्यक्रमांचा इव्हेंट करणाऱ्या भाजप सरकारकडे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी पैसेच नाहीत. म्हणूनच ते जिल्हाधिकाऱ्यांसारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत नोटीस काढून कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करत आहेत, असा आरोप करत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी दिला आहे.

दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी नोटीस काढून 26 जानेवारी तथा प्रजासत्ताक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी सर्व कायमस्वरूपी वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना आपल्या पगारातून प्रत्येकी 1 हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे. यावरून काँग्रेसचे आमदार फेरेरा आज सरकारवर भडकले.

हे पैसे कोणत्या स्वरूपात जमा करणार? त्याची पावती कोण देणार? ते कोणत्या अकाउंटमध्ये जमा करणार? त्या पैशांचा खर्च कसा करणार? कोणत्या संस्थांना यातील पैसे किंवा कामे देणार? त्या निवडीचे निकष काय? पैसे शिल्लक राहिले तर ते कुठे जमा करणार? अशा प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला.

हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम नसून ते त्यांनी तातडीने बंद करावे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करावी किंवा त्यांच्यावर इतर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महसूलमंत्र्यांनी मागविले स्पष्टीकरण

राष्ट्रीय सण साजरे करण्यासाठी अधिकाऱ्यांना अशाप्रकारे नोटीस काढून सक्तीचे पैसे वसूल करता येत नाहीत. त्यामुळे ही नोटीस नेमकी का आणि कशासाठी काढली? यासंबंधीचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ते स्पष्टीकरण आल्यानंतर यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT