Congress MLA belong to BJP Dainik gomantak
गोवा

'कॉंग्रेसने हार पत्करली, दोन्ही आमदार भाजपाचेच'

दयानंद सोपटेंना निवडताना मंत्री म्हणून निवडा; 22 प्लस आमदार..

दैनिक गोमन्तक

मोरजी : मांद्रेवासियांनी मांद्रे मतदार संघातून आमदार म्हणून नव्हे तर मंत्री म्हणून निवडून द्यायच आहे. आणि राज्यात 22 प्लस आमदार निवडून आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी, श्री भगवती मंदिरात श्रीफळ ठेवल्यानंतर स्थानिक पत्रकांकडे बोलताना व्यक्त केले.

यावेळी आमदार दयानंद सोपटे, भाजपा (BJP) मंडळ अध्यक्ष मधु परब, महिला अध्यक्ष दीपा तळकर, नयनी शेटगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेसने हार पत्करली

मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी पुढे बोलताना मांद्रे मतदार संघातून जनतेला आमदाराबरोबरच मंत्री निवडून द्यायचा आहे. आणि आमदार दयानंद सोपटे पुढील भाजपाच्या सरकारात मंत्री असतील अशी ग्वाही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. मांद्रे मतदार संघातून कॉंग्रेसने निवडणुका पूर्वीच आपली हार पत्करून उमेद्द्वारी जो पक्ष निवडणून येत नाही त्याला दिली. कॉंग्रेसचा हात गायब करणाऱ्यांकडून जनतेने अपेक्षा ठेवू नये, त्यामुळे निवडणुका (Election) पूर्वीच आमदार दयानंद सोपटे यांचा विजय झाला आहे.

दोन्ही आमदार भाजपाचेच

मुख्यमंत्री (CM) डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बोलताना राज्यात 2022 च्या निवडणुकीत राज्यात 22 प्लस आमदार येतील आणि त्यात पेडणे आणि मांद्रे या दोन्ही मतदार संघाचे भाजपाचे आमदार असतील असा विश्वास व्यक्त केला. मान्द्रेत कॉंग्रेसचने आपला हात ज्या पार्टीला अस्तित्व नाही त्या पक्षाच्या दावणीला बांधला असा दावा केला.

मागची पाच वर्षे दयानंद सोपटे मांद्रे मतदार संघात ज्या पद्धतीने आणि राज्यात गोवा पर्यटन खात्यातर्फे विकास चालू आहे, आणि काम करण्याची पद्धत पाहिल्यास मंत्री पद देवून त्यांचा आम्ही सन्मान करणार असल्याचे डॉक्टर सावंत यांनी सांगितले. मान्द्रेची जनता आता आमदार नव्हे तर मंत्री निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला.

प्रवीण निवडून येतील

पेडणे मतदार संघातून प्रवीण आर्लेकर याना भाजपात घेवून आम्ही उमेदवारी दिली, भाजपा संघटना ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने मोठ्या मताधिक्क्याने प्रवीण आर्लेकारही निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्याकडे बोलणी सुरु

माजी मुख्यमंत्री प्रा. पार्सेकर यांनी भाजपा सोडल्याने त्याचा भाजपावर परिणाम होईल का असा सवाल उपस्थित पत्रकारांनी केला असता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी उत्तर देताना भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान पार्सेकर यांच्याकडे बोलणी चालू आहेत पक्षाला यश येईल आणि पुन्हा पार्सेकर पक्षात सामील होवून भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला.

आमदार दयानंद सोपटे

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आपण मंद्रेचा आमदार असताना पाच वर्षासाठी जो विकास केला तो मान्द्रेवासियान्च्या रुदयात आहे, मंत्री नसतानाची महामंडळाचा चेरमेन असताना राज्यभर विकास केला, त्या विकासाची शाबासकी पंतप्रधान मोदिजी आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून मिळत आहे, हे आपले भाग्य आहे. जनता आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून राज्यात भाजपचे सरकार आणतील असा विश्वास व्यक्त करून गोमान्ताकीयानी डॉक्टर प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देण्याचे आवाहन केले.

माजी सरपंच अनंत गडेकर यांनी प्रतिक्रिया देताना आमदार (MLA) दयानंद सोपटे याना आम्ही मतदार संघातून तिसऱ्यांदा विजयी करणार आहोत 2017 आणि 2019 च्या निवडणुकीत कोण कुणासोबत होता आणि कोण नव्हता हे जनतेला माहित आहे, आमच्यावर विरोधकांचा काहीही परिणाम होणार नाही असा दावा अनंत गडेकर यांनी केला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT