गोवा

Goa Politics: पी. चिंदमबरम यांचा गोव्यातील तीन आमदारांसाठी खास संदेश

कार्लुस फरेरा, युरी आलेमाव आणि अल्टोन डिकॉस्टा यांच्यासाठी माजी अर्थमंत्री पी. चिंदमबरम यांचा संदेश

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आठ काँग्रेस आमदारांनी बंड केल्यानंतर 2/3 पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात आला. विधानसभेत केवळ अकरा आमदार निवडून आलेल्या काँग्रेसमध्ये या बंडानंतर केवळ तीन आमदार उरले आहेत. यामध्ये हळदोणाचे आमदार कार्लुस फरेरा, कुंक्कळीचे आमदार युरी आलेमाव आणि केपेंचे आमदार अल्टोन डिकॉस्टा हे आमदार आहेत. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील आमदार बंडाच्या तयारीत होते, अखेर बुधवारी दिगबंर कामत, मायकल लोबो यांच्यासह आठ आमदारांनी भाजपमध्ये आसरा घेतला.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर गोव्यात उरलेल्या तीन आमदरांचे काँग्रेसमधून कौतुक केले जात आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंमबरम (P. Chidambaram) यांनी आमदार कार्लुस फरेरा, युरी आलेमाव आणि अल्टोन डिकॉस्टा यांचे अभिनंदन करत शुभेच्छा संदेश दिला आहे.

"कार्लुस फरेरा, युरी आलेमाव आणि अल्टोन डिकॉस्टा हे सर्व आमदारांमध्ये उंच आणि अभिमानास्पद आहेत. या आमदारांची देव, पक्ष, मतदार आणि त्यांच्या तत्त्वांप्रती असलेल्या अखंड निष्ठेला मी सलाम करतो. देव आणि गोव्याच्या जनता त्यांना आशीर्वाद देवो." असा संदेश पी. चिंदमबरम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर लिहला आहे.

आमदार युरी आलेमाव यांनी पी. चिदंमबरम यांनी दिलेल्या कौतुक संदेशाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadash Yog 2026: ग्रहांचा राजा अन् देवांचे गुरु एकत्र! 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस; द्विद्वादश दृष्टी योगाचा मोठा चमत्कार

U20 Asian Cup 2027: दोन दशकांचा दुष्काळ अखेर संपला! 20 वर्षांच्या वनवासानंतर टीम इंडियाची 'एएफसी आशिया कप'मध्ये दिमाखदार एन्ट्री

Aitar Worship Traditional: 'आयतार पूजन' गोवा-कोकणची लोकपरंपरा आणि निसर्गाचं अतूट नातं!

Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

Porvorim Gun Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण; पोलिसांना चकवा देणारे 'ते' नेमके आहेत तरी कुठे? गोवा पोलिसांची 'स्पेशल टीम' उत्तर-पश्चिम भारतात रवाना

SCROLL FOR NEXT