Congress leader Manikrao Thackeray Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: भ्रष्टाचारी मंत्र्याला हकलण्याची हिंमत नसलेल्या मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा; माणिकराव ठाकरे कडाडले

Manikrao Thackeray Criticized Goa Government: आदिवासी कल्याण विभागात लाच घेऊन कंत्राटदाराच्या फाईल्स मंजूर केल्या जातात, असा आरोप राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर सावंत सरकारमधील धुसफूस चव्हाट्यावर आली.

Manish Jadhav

पणजी: आदिवासी कल्याण विभागात लाच घेऊन कंत्राटदाराच्या फाईल्स मंजूर केल्या जातात, असा आरोप राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर सावंत सरकारमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. सावंत सरकारमध्ये काही अलबेल नाही अशा चर्चांना उधाण आले. मंत्री गावडे यांच्या आरोपानंतर विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसने सावंत सरकारचा चांगलाच समाचार घेतला. भ्रष्टाचारी मंत्र्याला हकलण्याची हिंमत नसलेल्या मुख्यमंत्री सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी घणाघाती टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.

विरोधकांचा सावंत सरकारवर हल्लाबोल

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनीही सावंत सरकारवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले की, सावंत सरकार भ्रष्टाचार (Corruption) आणि अंतर्गत कलहाने भरलेले आहे. गावडेंनी केलेल्या दाव्यांचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले की, या खुलाशातून गोव्यातील लोकांची कशा पद्धतीने फसवणूक केली जातेय हे स्पष्ट होते.

माणिकराव ठाकरेंचा घणाघात

ठाकरे म्हणाले की, "मी गोव्यात प्रभारी म्हणून असल्यापासून सावंत सरकारच्या भ्रष्टाचाराचाविषयी ऐकत आहे. जनतेलाही हे समजते की, इथे पैशाशिवाय कोणतेही काम होत नाही. प्रत्येक सरकारी विभाग भ्रष्टाचाराने पोखरलेला आहे. हे गोव्यातील लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे अपयश आहे.''

मुख्यमंत्र्यांच्या मौनावरही ठाकरेंचा हल्लाबोल

ठाकरे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या मुद्द्यावरील मौनावरही सवाल उपस्थित केले. त्यांची या प्रकरणातील निष्क्रियता त्यांचा सहभाग असल्याचे सुचवते. जर मुख्यमंत्र्यांना खरचं वाटत असेल की, भ्रष्टाचार झाला आहे, तर त्यांनी संबंधित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे. पण त्यांच्यात असे काही करण्याची हिंमत आहे का? हाही एक सवाल आहे, असे म्हणत ठाकरेंनी सरकारवर ताशेरे ओढले.

'सरकारला संपत्ती आणि सत्तेत जास्त रस'

दुसरीकडे, कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनीही सावंत सरकारचा या मुद्यावरुन समाचार घेतला. फर्नांडिस म्हणाले की, "केवळ सत्य बोलल्याबद्दल मंत्री गावडेंना लक्ष्य केले जात आहे. गावडे जे काही बोलत आहेत ते सत्य आहे. या सरकारला गोव्यातील खऱ्या समस्या सोडवण्याऐवजी संपत्ती आणि सत्तेत जास्त रस आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT