Amarnath Panjikar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : निविदेची प्रक्रिया घाईगडबडीने का?

पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे; अमरनाथ पणजीकर यांची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress : राज्यात 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जात असून या स्पर्धेसाठी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीकडून गोवा क्रीडा प्राधिकरणाला चमत्काराची अपेक्षा का आहे. स्पर्धेच्या कार्यक्रम व्यवस्थापनासाठी 24 तासांपूर्वी अंदाजे 3.48 कोटींच्या कामाची निविदा जारी केली असून त्यांच्याकडून भलत्याच अपेक्षा ठेवल्याची टीका कॉंग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

या कामाच्या निविदेची प्रक्रिया घाईगडबडीने का काढण्यात आली, असेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. क्रीडा प्राधिकरणाने 9 सप्टेंबर रोजी स्थानिक दैनिकांमध्ये ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून निविदा मागितल्या. फिफासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या कार्यक्रम आयोजनासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून मागविलेल्या निविदेत या कामाच्या एकंदरीत कार्यक्षेत्राचा आणि इतर तांत्रिक बाबींचा उल्लेखच नाही. सरकारची ही निविदा म्हणजे भाजपच्या ‘मिशन कमिशन’चे धोरण पुढे नेण्याचाच प्रकार आहे, असे पणजीकर यांनी म्हटले आहे.

24 तासांत काम कसे करणार?

गोवा क्रीडा प्राधिकरणाने जारी केलेल्या जाहिरातीत कोणत्याही घटकाचा तपशील नसताना या कामासाठी 3.48 कोटींचा अंदाजे खर्च कोणत्या आधारावर काढला गेला आहे. या कामाची निविदा 19 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा. उघडण्यात येईल. मात्र, हा कार्यक्रम 21 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे गोवा क्रीडा प्राधिकरणाने नमूद केले आहे. या तारखांकडे बारकाईने लक्ष दिल्यास ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीला कामाचा आदेश मिळाल्यापासून 24 तासांपेक्षा कमी वेळ मिळतो.

निविदेत इत्थंभूत तपशिल नाही

या निविदेत कामाच्या व्याप्तीबाबत नमूद केलेले नाही. प्रतिनिधींची संख्या, कार्यक्रम स्थळ, निमंत्रण पत्रिकांची संख्या इत्यादी तपशील देण्यात आलेला नाही. 24 तासांपेक्षा कमी वेळेत बसेस आणि वाहनांची व्यवस्था करणे, गाण्याची निर्मिती करणे या अशक्य गोष्टी असल्याचे पणजीकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT