Goa Government | Amarnath Panajikar Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादईसाठी भांडणारे खंवटे गप्प का? अमरनाथ पणजीकरांनी शेअर केला जुना व्हिडीओ

काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांनी याचा व्हिडीओच ट्विट करत खंवटेंना आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय.

आदित्य जोशी

Mahadayi Water Dispute : म्हादई नदीवर कर्नाटककडून बांधल्या जाणाऱ्या प्रकल्पावरुन सध्या गोव्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्या आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांनी भाजपमध्ये हल्लीच दाखल झालेल्या आणि मंत्रिपद मिळवलेल्या पर्वरीचे आमदार रोहन खंवटेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात खंवटे तत्कालीन भाजप सरकारला म्हादई प्रश्नावरुन खडे बोल सुनावताना दिसत आहेत.

काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकरांनी याचा व्हिडीओच ट्विट करत खंवटेंना आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय. रोहन खंवटे तुम्ही भाजपमध्ये नसताना जी तुमची म्हादईबद्दल भूमिका होती तीच आजही आहे का? आपल्या राजकीय फायद्यासाठी म्हादई कर्नाटकला विकली जात असतानाही तुम्ही गप्प का? तुम्ही प्रमोद सावंतांच्या सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे तुम्हाला गप्प राहता येणार नाही? गोव्याच्या जनतेला तुमचं मत ऐकायचं आहे, असं म्हणत पणजीकरांनी एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं आहे तरी काय?

अमरनाथ पणजीकरांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी तत्कालीन प्रमोद सावंतांच्याच सरकारवर टीकेची झोड उठवल्याचं दिसत आहे. "म्हादईचा प्रश्न पेटला असताना मुख्यमंत्री अजूनही गोव्यातच काय करताहेत? म्हादई जलतंट्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत कोणती भूमिका घेतली? पर्यावरण खात्यासोबत कोणता पत्रव्यवहार केला?

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घ्यावी. पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांनीच सांगावं की म्हादईबाबतीत अशा प्रकारची भूमिका केंद्राने घेऊ नये." अशा शब्दात खंवटे या व्हिडीओमधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना थेट आव्हान देताना दिसत आहेत. याच व्हिडीओचा हवाला देत अमरनाथ पणजीकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT