Amit Patakar Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: पाटकरांची 'खुर्ची' आणखी मजबूत! ठाकरेंकडून कौतुक, अंतर्गत कलहाचीही घेतली दखल

Amit Patkar: ठाकरे यांनी पाटकारांच्या कामाचे कौतुक तर केलेच आहे, परंतु अंतर्गत कलहाची त्यांनी दखलही घेतली आहे.

Sameer Panditrao

Amit Patkar leadership

पणजी: तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासोबत विविध मतदारसंघातील पक्षाच्या गटसमित्यांच्या बैठका घेऊन पक्ष बांधणीचे काम पुढे नेणाऱ्या अमित पाटकरांची खुर्ची आणखी मजबूत होणार आहे.

ठाकरे यांनी पाटकारांच्या कामाचे कौतुक तर केलेच आहे, परंतु अंतर्गत कलहाची त्यांनी दखलही घेतली आहे. पाटकर यांनी रविवारी ‘गोमन्तक''कडे बोलताना गोवा प्रभारी ठाकरे आणि पाटकर यांच्यात दरी निर्माण झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते.

त्याशिवाय आपल्याविषयी प्रसारमाध्यमांकडे आपल्याच पक्षातील लोक चुकीची माहिती पोहोचवित असल्याचे सांगितले होते. ठाकरे गोव्यात असताना हा सर्व प्रकार घडल्याने त्यांना या वृत्ताची आणि घडत असलेल्या घटनांची दखल घ्यावी लागली आहे. ठाकरे यांनी आल्यानंतर गोव्यातील चार मतदारसंघातील गटसमित्यांच्या बैठका घेतल्या आणि पक्ष बांधणीविषयी, त्याचबरोबर गटसमितीच्या कार्यांची माहिती जाणून घेतली. त्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मार्गदर्शन केले.

पाटकरांनी पडती बाजू सांभाळली

पाटकर यांचे खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते तथा आमदार युरी आलेमाव, आमदार कार्लोस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांशी संबंध चांगले आहेत. आठ आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाची पडती बाजू त्यांनी सांभाळली आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असताना पक्षातील काही घटक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले आहे. पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ४० ही मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT