P Chidambaram will coordinate for Congress ahead of elections in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections 2022: राज्यातील कॉंग्रेसची जबाबदारी पी. चिदंबरम यांच्यावर

कॉंग्रेसने गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections) वरिष्ठ निरीक्षक आणि समन्वयक म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांची आज नियुक्ती केली

दैनिक गोमन्तक

कॉंग्रेसने (Congress) गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections) वरिष्ठ निरीक्षक आणि समन्वयक म्हणून माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांची आज नियुक्ती केली. स्थानिक पक्षांशी कॉंग्रेस आघाडी करणार की नाही याविषयी पक्षाची भूमिका स्पष्ट होत नसताना निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी चिदंबरम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Congress appoints P Chidambaram as Coordinator for Goa ahead of elections)

कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही नियुक्ती केल्याचा आदेश कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जारी केला आहे.

भारताचे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात कॉंग्रेसला विजयी करण्याच्या इराद्याने काँग्रेसच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी पाठवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आदेश काढण्यात आलेला आहे. मार्च २०२२ ला गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकात काँग्रेसची निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी निवडणूक निरिक्षक म्हणून पी चिदंबरम यांंची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत गोव्यात कॉंग्रेस पक्षाला सर्वात जास्त १७ जागा मिळूनही तो पक्ष सत्तेवर येऊ शकला नव्हता. तर १३ जागा मिळवलेल्या भाजपने इतर पक्षांच्या सहकार्याने सत्ता काबीज केली होती. त्यावेळी दिग्विजय सिंग हे गोव्याचे कॉंग्रेसचे प्रभारी होते. यावेळी मात्र चिदंबरम यांना गोवा निवडणूक प्रभारी तथा निरीक्षक म्हणून कॉंग्रेसने नियुक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

Bicholim Marigold Farming : डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT