Congress candidates list  Dainik Gomantak
गोवा

कुडतरीत काँग्रेसकडून चार उमेदवारांची यादी जाहीर

मोरेन रिबेलो यांनी अवघ्या 20 दिवसात भाजप सोडून पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता

दैनिक गोमन्तक

मडगाव : कुडतरी मतदारसंघासाठी काँग्रेसने चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून काल ही चार नावे केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती प्रदेश समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली.

यापूर्वी काँग्रेसने या मतदारसंघात आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उमेदवारी जाहीर केली होती. नंतर रेजिनाल्ड काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये (Trinamool) प्रवेश केल्याने काँग्रेस आता या मतदारसंघात नवीन उमेदवार शोधत आहे.

शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार फ्रान्सिस सार्दीन यांचे पुत्र शॅलोम सार्दीन यांच्यासह कुडतरीच्या जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो, यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपात गेलेले आणि रेजिनाल्ड यांनी काँग्रेस (Congress) सोडल्यावर पुन्हा काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो तसेच वरीष्ठ स्थानिक नेते व राशोलचे माजी सरपंच जोसेफ व्हाझ यांचा समावेश आहे.

यापूर्वी कुडतरीतून आपला पुत्र शॅलोम यालाच काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी मागणी खासदार सार्दीन यांनी केली होती. तर रेजिनाल्ड काँग्रेस सोडून गेल्यावर उमेदवारीची संधी मिळण्याची संधी उपलब्ध झाल्याने मोरेन रिबेलो यांनी अवघ्या 20 दिवसात भाजप (BJP) सोडून पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते 10 डिसेंबर रोजी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. 31 डिसेंबर रोजी त्यांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karapur Sarvan Sarpanch: कारापूर-सर्वण सरपंच निवडीसाठी मंगळवारी बैठक, बिंदिया सावंत यांचे नाव निश्‍चित तरी उत्सुकता

Goa Monsoon: पावसाचा 20 इंचांचा टप्पा पार, मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम; रविवारी 1 इंच पावसाची नोंद

खरी कुजबुज: काँग्रेस व भाजप अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात!

Goa Congress: फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, चिट्टी बाबू घंटावर कारवाई कधी? काँग्रेसचा सरकारला सवाल

Banyan Plantation: राज्‍यभरात लावणार वडाची 10 लाख रोपटी, जैवविविधता मंडळामार्फत महिनाभर करणार मोफत वितरण- मुख्‍यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT