Goa Panchayat Election News Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील पंचायत निवडणूक पुढे जाण्याच्या शक्यतेने उमेदवारांमध्ये संभ्रम!

आरक्षण निश्‍चित झाले नसल्याने चलबिचल

दैनिक गोमन्तक

फोंडा: राज्यातील पंचायत निवडणूक पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संभाव्य इच्छूक उमेदवारांत संभ्रम निर्माण झाला आहे.

सुरुवातीला 4 जून ही तारीख पंचायत निवडणुकीसाठी निश्चित केली होती. त्यानंतर ती 12 जून करण्यात आली. पण आता आरक्षणाच्या गोंधळामुळे ही निवडणूक 12 जूनला होणे शक्य नाही. ही निवडणूक सहा महिने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास 20 जूनपासून सर्व 176 पंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात येईल. 19 जून हा विद्यमान पंचायतींचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी सर्व पंचायतीतल्या प्रतिनिधींचा काळ संपुष्टात येईल आणि ग्रामस्थांना कामांकरिता प्रशासकांवर अवलंबून राहावे लागेल. मुख्य म्हणजे यामुळे काही संभाव्य उमेदवारांच्या प्रचारावर पाणी पडण्याची शक्यता दिसत आहे.

...तर रणनीतीत बदल: काही उमेदवारांनी प्रचाराचा ‘धुमधडाका’ उडवायला सुरुवात केली असून लांबणीवर पडणारी निवडणूक त्यांच्या या धुमधडाक्याआड येऊ शकते. त्याचबरोबर काही राजकीय पक्षांनी जी तयारी सुरू केली आहे, त्यावरही थोड्या काळाकरिता का होईना पडदा पडू शकतो. कॉंग्रेस, भाजप यासारख्या पक्षांनी आपले पॅनल तयार करण्यास सुरुवात केली होती. पण आता निवडणूक लांबणीवर पडल्यास त्यांना रणनीतीचा फेरविचार करावा लागेल.

‘टु बी ऑर नॉट टू बी’: फोंड्यातील 19 पंचायतींत सध्या उमेदवारांची ‘टु बी ऑर नॉट टू बी’ अशी परिस्थिती झाली आहे. आणखी काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार असल्यामुळे या उमेदवारांना त्या काळात प्रचार करणे कठीण होणार आहे. पावसाळा संपल्यानंतर लगेच निवडणुका झाल्यास त्याला तोंड देणेही काही उमेदवारांना कठीण जाऊ शकते, असा रंग दिसतो आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

SCROLL FOR NEXT