CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

National Democratic Alliance: चंदीगड येथे नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची परिषद घेतली. हरियाणातील विजयाबद्दल पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्या ठरावाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अनुमोदन दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पर्यटन, संस्कृती, उद्योग आणि नवोन्मेष यातील गोव्यातील अद्वितीय सामर्थ्य भारताच्या उत्थानात महत्त्वाचे योगदान देणारे आहे. आत्मनिर्भर भारत, सर्वांसाठी स्वावलंबन, शाश्वतता आणि समृद्धी यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकार समर्पित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले. चंदीगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची परिषद घेतली.

हरियाणा सरकारच्या शपथविधीनंतर या परिषदेस सुरवात झाली. हरियाणातील विजयाबद्दल पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्या ठरावाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अनुमोदन दिले.

या परिषदेत सुशासनाला चालना देण्यावर आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यक्षम वितरणाची खात्री करण्यावर चर्चा करण्यात आली. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेसाठी रालोआच्या वचनबद्धतेला या बैठकीत दुजोरा मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर दिली आहे. या राष्ट्रीय प्रवासात गोवा महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT