G20 Dainik Gomantak
गोवा

G-20 Summit in Goa 2023: भारताच्या आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांशी इतर सदस्य देशांची संमती- मांडवीय

कोरोना : भीती, दुर्लक्षाचे दुष्टचक्र भेदुया!

गोमन्तक डिजिटल टीम

G-20 Summit in Goa 2023: G-20 सदस्य राष्ट्रांनी आरोग्य क्षेत्रात संशोधन, औषध निर्मिती आणि सामूहिक सहकार्य वाढविणे गरजेचे असून कोरोनाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्यास मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले.

गोव्यात सुरू असलेल्या दुसऱ्या जी-20 आरोग्य कार्यगट बैठकीच्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री डॉ. मांडवीय बोलत होते.

जी-20 आरोग्य कार्य गट म्हणून आम्ही भविष्यातील जागतिक आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि व्यवस्थांसाठी संयुक्तपणे सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने योग्य दिशेने वाटचाल करत आहोत, असे  डॉ. मांडवीय म्हणाले.

भारताने प्रस्तावित केलेल्या आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांशी इतर सदस्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी संमती दर्शविल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

कोरोना महामारीचा  जगभरातील आरोग्य व्यवस्थांवर झालेला परिणाम अधोरेखित करत  डॉ. मांडवीय म्हणाले, आता भीती आणि दुर्लक्ष अशा दोन्हींचे चक्र भेदण्याची आपली सामूहिक जबाबदारी आहे.

याआधी महामारीचा सामना करताना झालेल्या त्रुटी आताच्या महामारीविरुद्धच्या लढ्याला अडथळा ठरणार नाहीत,  याची काळजी घ्यायला हवी.  याआधी इटली आणि इंडोनेशियाच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळातील कामांची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे.

जागतिक समन्वय यंत्रणेची गरज:-

वैद्यकीय काउंटरमेझर्स (एमसीएम)  अजेंड्यावर एकत्रित प्रयत्न व्हायला हवेत. आरोग्य सेवा वितरणामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी  जगभरातील डिजिटल तफावत कमी करण्यासाठी आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल आरोग्य आणि नवोन्मेषविषयक अजेंडा भारताने मांडला आहे,  यासाठी जागतिक समन्वयाची गरज आहे, असेही डॉ. मांडवीय म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT