Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘भोगोसणी’तून गोवा मुक्तीनंतरचे जळजळीत वास्तव: डॉ. सोमनाथ कोमरपंत

Panaji News : ॲड.रमाकांत खलप यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, ॲड. रमाकांत खलप यांनी ज्या जीवनदृष्टीने आयुष्याच्या प्रवासाकडे पाहिले ती जीवनदृष्टी अनुभव संपन्न लेखणीतून ‘भोगोसणी’ मधून उतरली आहे.

इथल्या यक्षप्रश्नांच्या प्रत्येक बिंदूशी त्यांचे नाते असल्याने यातील विचारप्रकटन कृतीशीलतेशी जोडलेले आहे. त्यांनी मुक्तीनंतरचे जळजळीत वास्तव ओघवत्या शब्दांतून मांडले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ.सोमनाथ कोमरपंत यांनी येथे केले.

बुधवारी येथील आयएमबीच्या छोटेखानी सभागृहात माजी केंद्रीय कायदा मंत्री तथा लेखक, विचारवंत ॲड. रमाकांत खलप यांच्या भोगोसणी या वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन केल्यानंतर डॉ. कोमरपंत हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा, कोकण मराठी परिषद, गोवा व गोमंतक साहित्य सेवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा पार पडला.

व्यासपीठावर प्रमुख वक्ते पत्रकार परेश प्रभू, आयएमबी चे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव मिलिंद माटे, कोमप चे अध्यक्ष सागर जावडेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, ‘गोसासे’चे अध्यक्ष रमेश वंसकर, चित्रा क्षीरसागर, पत्रकार प्रभाकर ढगे उपस्थित होते.

गोव्याच्या भेदक वास्तवाचे चित्रण !

परेश प्रभू यांनी सांगितले की,भोगोसणी मध्ये आजच्या गोव्याचे भेदक वास्तव, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अध:पतनाचे चित्रण आहे.

ॲड. खलप हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या मनातील अस्वस्थता, खदखद इथे व्यक्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT