Comunidade The Goan
गोवा

Goa Comunidade: अखेर वादग्रस्त कोमुनिदाद प्रशासक नाईक निलंबित!

Goa Government: दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

कोमुनिदादच्या दक्षिण गोवा विभागाचे प्रशासक प्रदीप नाईक यांना आज कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले. दक्षता खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी हा आदेश जारी केला.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई व बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केलेल्या आरोपांत तथ्य असेल तर त्यांना निलंबित करा,असा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिला होता. कामाकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका नाईक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत. ते कामावर हजर राहत नाहीत. कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे फाईल पुढे जात नाही. मुंगुल येथील कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदेशीर घर पाडण्याचे आदेश असूनही त्या घरावर कारवाई होत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेत करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अय्‍यांनी खडक फोडून आणले पाणी; देशभरात गाजली जिद्दीची कहाणी! 'मन की बात'मध्‍ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून कौतुक

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाचा मोठा दिलासा! वयानुसार पेन्शन वाढणार; 90 व्या वर्षी मिळणार पूर्ण 'पगाराएवढी रक्कम'

Goa Drugs: आंतरराज्‍य बसमधून ड्रग्‍सची नेपाळ ते गोवा व्हायची तस्करी; गोवा पोलिसांकडून यूपी अधिकाऱ्यांच्‍या साहाय्याने रॅकेटचा पर्दाफाश

'फेक' पेमेंट दाखवून दागिने लुटले, अन् चोरीच्या पैशांवर गोव्यात 'नाईटलाईफ'ची मजा; कळंगुटच्या पबमधून केरळच्या भामट्याला बेड्या

Fire In Gujarat Titans Team Bus: फायनलनंतर मोठी दुर्घटना! गुजरातच्या बसला आग; शुभमन गिल, बटलरसह सर्व खेळाडू 1 तास रस्त्यावर! वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT