घनश्याम शिरोडकर Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिकेतील डाटा ऑपरेटर्स नियुक्त्या पुर्णपणे रद्द करा : घनश्याम शिरोडकर

फाईल लपवून ठेवल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव पालिकेत 5 नवीन डाटा ऑपरेटर्स घेण्याच्या प्रक्रियेवर नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी आक्षेप घेतल्यावर या नियुक्त्याना स्थगिती देण्यात आली असली तरी ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करा, अशी मागणी शिरोडकर यांनी केली आहे.

या नियुक्ती प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा घोळ नसल्याचा दावा नगराध्यक्ष लिंडन परेरा आणि मुख्याधिकारी रोहित कदम यांनी जरी म्हटले असले तरी तो प्रत्यक्षात घोळच आहे. अन्यथा ज्या नियुक्ती पत्रावर नगराध्यक्ष परेरा यांनी सही केली होती तीच प्रक्रिया त्यांना स्थगित का ठेवावी लागली असा सवाल शिरोडकर यानी केला.

पालिका मंडळाच्या बैठकीत या कामासाठी शालेय शिकाऊ विद्यार्थ्यांना घेण्याचा ठराव घेतला होता. तो बदलून मानव संसाधन महामंडळाकडून कामगार कसे घेतले गेले असा सवाल करून नगर मंडळाला पुर्णतः अंधारात ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

या नियुक्त्यांची फाईल मला पाहण्यास द्यावी अशी मी मागणी केली होती. पण मुख्याधिकारी कदम यांनी ती बंद करून ठेवली असून स्वतः ते रजेवर गेले आहेत. ती फाईल कुणालाही दाखवू नका असा स्पष्ट निरोप त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिला आहे असे सांगून यात आपल्याला काहीतरी गोलमाल वाटतो. जर ही फाईल गहाळ झाली तर त्याला मुख्याधिकारी कदम व नगराध्यक्ष परेरा हे जबाबदार असतील असे ते म्हणाले. या फाईलीची आपण माहिती हक्क कायद्याखाली ताबा घेणार असल्याचेही त्यानी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT