Crime theft Canva
गोवा

Goa Theft: वीस लाखांच्या प्लेटस गेल्या चोरीला; फिनोलेक्स कंपनीची तक्रार

Finolex Tisc-Usgao: चोरीप्रकरणी ट्रकचा चालकावर संशय व्यक्त करण्यात येत असून सध्या तो गायब आहे

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्रातून तिस्क - उसगाव येथील फिनोलेक्स कंपनीत आणल्या गेलेल्या तांब्याच्या प्लेटस् ची चोरी झाल्याची तक्रार फोंडा पोलिसांत करण्यात आली आहे. या चोरीप्रकरणी ट्रकचा संशयित चालक मूळ बीड - महाराष्ट्रातील अशोक याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून सध्या तो गायब आहे. पोलिस त्याच्या शोधात आहेत.

तिस्क - उसगाव येथील फिनोलेक्स कंपनीसाठी महाराष्ट्रातून एमएच०९ एफएल ७५४७ या क्रमांकाच्या ट्रकमधून २६ टन तांब्याची प्लेटस् आणण्यात आल्या होत्या, मात्र वजन काट्यावर प्लेटस् सह ट्रकचे वजन केले असता अडिच टन तांब्याच्या प्लेटस् कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे फोंड्यातील सुरेशकुमार शर्मा याने फोंडा पोलिसांत तक्रार नोंदवली.

ट्रकमधून गायब झालेल्या तांब्याच्या प्लेटस् ची एकूण किंमत २० लाख रुपये असून चोरी ५ ते ९ जुलै दरम्यान झाली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा ट्रक तांब्याच्या प्लेटस् घेऊन येत असताना चिपळूण - लांजा दरम्यानच्या प्रवासात या प्लेटस् गायब झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT