Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ड्रग्ज माफिया 'अटाला'ची माहिती लपवली! फ्लॅटमालक अडचणीत; हणजूण पोलिसांत तक्रार दाखल

Israeli Drug Dealer Arrest: गेल्या नऊ महिन्यापासून संशयित अटाला तेथे राहत असताना ही माहिती लपवण्यात आल्याचा ठपका या मालकावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस सूत्राने दिली.

Sameer Panditrao

पणजी: ड्रग्जप्रकरणी अटक केलेला कुप्रसिद्ध ड्रग्ज माफिया यानिव बेनाईम ऊर्फ अटाला याला भाडेपट्टीवर फ्लॅट दिलेल्या मालकाविरुद्ध अमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भाडेकरू ठेवलेल्या व्यक्तीची माहिती सी फॉर्म भरून जवळच्या पोलिस स्थानकात देणे सक्तीचे असताना ती फ्लॅटच्या मालकाने दिली नव्हती. गेल्या नऊ महिन्यापासून संशयित अटाला तेथे राहत असताना ही माहिती लपवण्यात आल्याचा ठपका या मालकावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस सूत्राने दिली.

दरम्यान, संशयित अटाला याला पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर दोन दिवस कोठडी न्यायालयाने वाढवून दिली होती. ही कोठडी आज संपल्याने पुन्हा ती वाढवून घेण्यासाठी त्याला उद्या ११ रोजी सकाळी म्हापसा येथील न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

गोव्यात वास्तव्य करणाऱ्या या संशयित अटालाचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे याचा तपास पोलिस करत आहे. गोव्यात येण्यापूर्वी त्याला उत्तराखंड पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्यप्रकरणी अटक केली होती. गोव्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे त्याला गोव्यात आणण्यात आले होते.

त्याला जामीन मिळाल्यानंतर अनेक महिने गोव्यात असल्याची माहिती पोलिसांनाही माहिती नव्हती. फ्लॅट मालकाने संशयित अटला याला लपून राहण्यास मदत केल्याची चौकशी हणजूण पोलिस गुन्हा दाखल झाल्यानंतर करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT