Shankar Polgi  
गोवा

Bicholim: शंकर पोळजींना 'राखणदार' होणे भोवले, हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी डिचोलीत तक्रार

Pramod Yadav

Goa Crime News

सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी आणि मरियानो फेर्राव बालेकार यांच्या विरोधात हिंदूंच्या भावना दुखावणे तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी डिचोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शंकर पोळजी यांनी हिंदू देवता राखणदार यांचा पेहराव करुन गोव्याचे रक्षण करु शकेल अशा उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर पोळजी यांनी हिंदू देवता राखणदार यांचा वेश परिधान करुन पाच मे रोजी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. पोळजी यांनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप या तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.

हिंदू लोकांकडून संपूर्ण गोव्यात राखणदार देवाची पूजा केली जाते. व्हिडिओत मरियानो यांना देखील दाखवण्यात आले असून, व्हिडिओत हिंदू जनभावनांचा अनादर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

शंकर पोळजी यांनी व्हिडिओ राखणदाराचा वेश परिधान केला असून, हातात मशाल घेतली आहे. पोळजी यांनी हिंदू संस्कृती आणि प्रतिकांचा अपमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT