Goa Latest News Dainik Gomantak
गोवा

कोलव्यात बांधकाम कचरा शेतात टाकल्याची तक्रार

कोलवा पंचायत क्षेत्रात असलेल्या शेतामध्ये बांधकाम प्रकल्पाचा टाकाऊ कचरा अज्ञाताकडून आणून टाकण्यात येत असल्याबद्दल स्थानिकांनी कोलवा पंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कोलवा पंचायत क्षेत्रात असलेल्या शेतामध्ये बांधकाम प्रकल्पाचा टाकाऊ कचरा अज्ञाताकडून आणून टाकण्यात येत असल्याबद्दल स्थानिकांनी कोलवा पंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे. हा टाकलेला टाकाऊ कचरा शेतीला मारक ठरत आहे. या बरोबरच पर्यावरणाचाही हानी होत असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही जमीन शेतीची असल्याने बांधकाम प्रकल्पाचा कचरा या ठिकाणी आणून टाकल्याने पुन्हा या जागेवर शेतीची मशागत होणार नाही. या विषयीची गंभीर दाखल घेऊन पंचायतीने बांधकाम प्रकल्पाचा कचरा आणून टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. बांधकाम प्रकल्पाचा हा कचरा कोलवा पंचायत परिसरातील गोल्डन क्राऊन बीच रिसॉर्ट जवळ असलेल्या शेतामध्ये टाकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT