Compensation Canva
गोवा

नुकसानग्रस्तांचे पुसले अश्रू ! पावसात घर गमावलेल्यांना १.७६ कोटींची आर्थिक मदत

Disaster Managment Department: आतापर्यंत ३३८ जणांना १.७६ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व याचा फटका अनेक घरांना बसला. दक्षिण गोवा जिल्हा आपत्कालीन विभागाकडून नुकसान झालेल्या व्यक्तींना तत्काळ मदत करण्यात आली आहे. आतापर्यंत ३३८ जणांना १.७६ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्यांना यावर्षी गणेश चतुर्थीपूर्वीच नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दक्षिण गोव्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. यामुळे दक्षिण गोव्यातील केपेतील ४६, सांगे तालुक्यातील ६८, सासष्टीतील ८३, काणकोण २८, मुरगाव ४०, धारबांदोडा २३ व फोंडा येथील ५० घरांना नुकसान पोहोचले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आमदारांना दिलेल्या आश्वासनानुसार दक्षिण गोवा जिल्हा आपत्कालीन विभागाने घरांच्या नुकसानीची पाहणी केली. तत्काळ अहवाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करत गणेश चतुर्थीच्या आधीच नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्त कुटुंबीयांना देण्याची व्यवस्था केली.

यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंद्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत यांच्यासह कोठावळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. आपत्कालीन व्यवस्थापनाने नागरिकांच्या नुकसानीची दखल घेऊन सर्वाधिक दोन लाख रुपयांची मदत केली आहे. यापूर्वी ही रक्कम फक्त ५० हजार रुपये होती. तसेच ही रक्कम नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास एक वर्षाहून जास्त काळ लागत होता.

सासष्टीत सर्वाधिक नुकसान

सासष्टीत सर्वाधिक ८३ घरांचे नुकसान झालेले असून ९६ लाख ९,१९७ रुपयांचा निधी देण्यात आला. केपेतील ४६ घरांसाठी १५ लाख ५८,२६६, सांगेतील ६८ घरांसाठी २० लाख ७० हजार ७७५ रुपये, काणकोणातील २८ घरांसाठी ७ लाख ५४ हजार ५९२ रुपये, मुरगावातील ४० घरांसाठी १७ लाख ३० हजार ९० रुपये, धारबांदोडातील २३ घरांसाठी ८ लाख ६६ हजार ८९४ रुपये तर फोंड्यातील ५० घरांच्या नुकसानीसाठी १९ लाख ४८ हजार ६५८ रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT