Subhash Shirodkar|Goa News Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: 'सहकार क्षेत्राचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा'

केरीतील सहकार संमेलनात उत्कृष्ट सहकारी संस्थांचा डॉ. दिव्या राणेंच्या हस्ते गौरव

दैनिक गोमन्तक

Subhash Shirodkar: एकमेकांना सहकार्य करणे हे सहकार क्षेत्राचा गाभा आहे. सहकार क्षेत्राचा लाभ बहुतांश सर्वसामान्यांना व्हावा या हेतूने सहकार क्षेत्राने काम करावे आणि आपला विस्तार वाढवावा. आज सहकार क्षेत्रातील बँकांचे व्याज दर 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

जर हे व्याज दर 10 टक्क्यांपेक्षा कमी केल्यास त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल त्यामुळे त्यावर विचार व्हावा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

केरी-सत्तरी येथे सत्तरी तालुका चवथे सहकार संमेलन पार पाडले. त्यावेळी उद्‌घाटन कार्यक्रमात बोलताना सुभाष शिरोडकर यांनी वरील आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार डॉ. दिव्या राणे, केरीच्या सरपंचा दीक्षा गावस, केरी अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत पिसुर्लेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष पांडुरंग गावस, सहकार संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष विष्णू पारोडकर, सचिव अनुराधा म्हाळशेकर, पाणी वाटप संस्थचे अध्यक्ष नकुळ राणे, सदस्य नामदेव केरकर, राजू गावस आदी मान्यवर उपस्थित होते.

केरी युथ क्लब येथे सत्तरी सहकार संमेलन समिती आणि केरी अर्बन सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडले. सूत्रसंचालन लक्ष्मण गावस तर आभार अनुराधा म्हाळशेकर यांनी केले.

तरुणांनी सक्रिय व्हावे!

आज गोव्यासारख्या राज्याला बाहेरील राज्यातून दूध, भाजीपालासारख्या बऱ्याच वस्तू आणाव्या लागतात. अशा वस्तूंचे उत्पादन जर मोठ्या प्रमाणात गोव्यात झाले तर उत्पादन वाढेल व त्याचा मोठा फायदा गोव्याला होईल. सहकार क्षेत्रातून याचा लाभ घेता येईल तेव्हा गोव्यातील तरुणांनी सहकार क्षेत्रातून याचा फायदा घ्यावा.

यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तेव्हा त्याचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, सक्रिय सहभागी व्हावे, असे मत डॉ. दिव्या राणे यांनी केले. यावेळी मेळावली येथील आनंद मेळेकर यांनी राबवलेल्या मध उत्पादन व्यवसायाबद्दल माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT