Margao Urban Bank  Dainik Gomantak
गोवा

मडगाव अर्बन बॅंकेतील ठेवीदारांना रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु

दहा हजार ठेवीदारांची एकुण रक्कम 120 कोटी, 45 हजार ठेवीदारांचे अजुन अर्ज नाहीत, , 250 लॉकर धारकांनी अजुन आपल्या मौल्यवान वस्तु नेल्या नाहीत

दैनिक गोमन्तक

सासष्टी: परेटीव्ह बॅंक सद्या लिक्विडेशनच्या परिस्थिती असुन ठेवीदारांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बॅंकेचे 56635 ठेवीदार असले तरी केवळ दहा हजार ठेवीदारांनीच रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. या सर्वांची परत करण्याची रक्कम जवळ जवळ 120 कोटी रुपया आहे. तसेच ज्या 45 हजार ठेवीदारांनी अजुन अर्ज केली नाहीत त्यांची रक्कम 30 ते 40 कोटी रुपये एवढी होते. (Commencement of repayment process to depositors of Madgaon Urban Bank in goa)

रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत होती. तो पर्यंत अर्ज केलेल्यांना ही रक्कम मिळणार आहे. लिक्विडेशनसाठी ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यांनी अजुनही अर्ज स्विकारणे सुरु ठेवले असले तरी या दहा हजार ठेवीदारांची रक्कम परत केल्यानंतरच उशीरा अर्ज केलेल्यांचा विचार केला जाईल असे अधिकारी किशोर आमोणकर यानी सांगितले.

सद्या डेपोझीट इन्शुरन्स एण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे अर्ज पोहोचले असुन हिशोब तपासुन व ठेवीदारांची खातरजमा केल्यावर रक्कम ठेवीदाऱांच्या खात्यात जमा होईल. डीआयसीजीसीने ही प्रक्रिया सुरु करण्यास प्राधान्य दिले आहे.

रिझर्व बॅंकेने (Reserve Bank of India) मडगाव अर्बन बॅंकेच्या लिक्विडेशनचा आदेश 29 जुलै 2020 रोजी काढला होता. तेव्हा बॅंकेकडे लिक्विडेशनसाठी 122.32 कोटी रोख रक्कम होती. तेव्हा 189.81 कोटी रुपया एकुण ठेवी होत्या. गोवा सरकारने लिक्विडेटर म्हणुन एस व्ही नाईक यांची नियुक्ती केली आहे.

बॅंकेच्या सर्व शाखामध्ये मिळुन 810 लॉकर

दरम्यान बॅंकेच्या (Margao Urban Bank) सर्व शाखामध्ये मिळुन 810 लॉकर आहेत. त्यातील 250 लॉकर धारकांनी अजुन आपले लॉकर सोडलेले नाहीत व त्यातील मौल्यवान वस्तु नेलेल्या नाहीत. जरी लॉकर परत करण्याची मुदत संपलेली असली तरी ज्या लॉकर धारकांनी अजुनही बॅंकेकडे संपर्क साधुन ते परत करता येतात. जर शेवट पर्यंत लॉकर धारक आले नाहीत तर नियमानुसार व कायदे कानुन पाळुन हे लॉकर फोडल्याशिवाय बॅंककडे दुसरा पर्याय असणार नाही असे आमोणकर यानी स्पष्ट केले. 

नियमाप्रमाणे ठेवीदारांना प्रत्येकी जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत रक्कम परत केली जाईल. त्यामुळे ज्यांच्या ठेवी त्या पेक्षा जास्त असेल त्या बाकी रकमेवर ठेवीदारांना पाणी सोडावे लागेल. त्यामुळे असे ठेवीदार आर्थीक दृष्ट्या अडचणीत आले आहेत असे बॅंकेचे माजी अधिकारी व ठेवीदार चंदन नायक यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

RCB Fans Lathi Charge Video: आरसीबीचा विजय फॅन्सच्या अंगाशी! हुल्लडबाजी नडली, पोलिसांनी काठीनं चोप चोप चोपलं; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT