डॉ. दिव्या विश्वजीत राणे Dainik Gomantak
गोवा

कोपार्डे येथील ब्राम्हणी महामाया देवस्थानच्या 'अग्रशाळेची' पायाभरणी

पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणेंच्या हस्ते शुभारंभ

दैनिक गोमन्तक

वाळपई: कोपार्डे येथे ब्राम्हणी महामाया देवस्थानच्या अग्रशाळेच्या बांधकामाचा शिलान्यास आज रविवारी पर्येच्या नवनिर्वाचित तथा राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी झालेल्या आमदार सौ. डॉ. दिव्या विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आला. कोपार्डे ग्रामस्थांच्यावतीने व अन्य जणांच्या सहकार्याने ही अग्रशाळा बांधण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

सौ. विजयादेवी प्रतापसिंह राणे, देवस्थान समिती अध्यक्ष प्रकाश सावंत उपस्थिती होते. ब्राम्हणी महामाया देवस्थान राज्यात प्रसिध्द असून या देवस्थानात तीर्थ दिले जाते.

या ठिकाणी रोगी लोक येऊन मुक्काम करतात. सध्याची अगरशाळा जुनी व लहान आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भक्तांना राहण्याची सोय होत नाही.सौ. दिव्या राणे म्हणाल्या, कोपार्डेची ब्राम्हणी महामाया लोकांना पावणारी आहे. अनेक रोगी लोकांनी बरे होण्याचा अनुभवही घेतला आहे. या ठिकाणी लोक येऊन कडक उपवास पाळून थांबतात व देवीचे तीर्थ घेऊन बरे होत आहेत. गेल्या अनेक वर्षांचा या देवस्थानचा इतिहास आहे. लोकांनी पुढाकार घेऊन नवीन अगरशाळेचा विचार केला, तो कौतुकास्पद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

Elephant In Goa: बिथरलेला ‘ओंकार’ हत्ती गोव्यात दाखल! मोपाच्या जंगल भागात ठोकला मुक्काम; Watch Video

Goa Crime: गाडी मागे घेण्यावरून वाद पेटला, दगडफेक करून पर्यटकांना मारहाण; काचेच्या बाटलीने स्वतःलाही केले जखमी

SCROLL FOR NEXT